दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन…
शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी
माध्यमिक व उच्च माध्यमिक /कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात व पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट कारभारा संदर्भात पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन आयोजित केले होते याची दखल घेऊन शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य संपत सूर्यवंशी यांनी सर्व मागण्या व्यवस्थित ऐकून घेतल्या व प्रत्येक मागणीनुसार संबंधितांना तात्काळ सूचना देऊन सोडवल्या जातील असे सकारात्मक आश्वासन सांगितले व संघटनेने देखील समस्या निर्माण होऊ नये यासाठी संघटने कडून मते मागवली.
यावेळी पुणे,सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी शालार्थ आय.डी. तात्काळ देण्यात देण्यासाठी संचालक पातळीवर ऑनलाइन स्वरूपात देण्याविषयी चर्चा झाली, वाढीव पदांच्या मान्यता व समायोजन त्वरित व्हाव्यात, डी.सी.पी.एस., एन.पी.एस. हिशोब पावत्या त्वरित द्याव्यात, भ्रष्ट व मग्रूर कनिष्ठ लिपिक यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत अंतर्गत कार्यवाही केली जाईल, अर्धवेळ ते पूर्णवेळ मान्यता त्वरित देण्यात येईल, अर्धवेळ शिक्षकांना सेवा शाश्वती दिली जाईल, संच मान्यता प्रचलित पद्धतीने केले जातील वेतन निश्चिती तालुका निहाय शिबिर लावले जाईल, शाळाबाह्य शिक्षकांना कामे देऊ नये या संदर्भात शासनास प्रस्ताव पाठवला जाईल, अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागा यांची माहिती उपसंचालक कार्यालयातील फलकावर लावली जाईल,
वाढीव पदांची राहिलेली यादी फलकावर लावली जाईल, वाढीव पदांच्या राहिलेल्या मान्यता याची माहिती संघटनेने घेऊन पुराव्यानिशी दाखल करण्यास सूचना संचालक यांनी दिल्या तसेच उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयात विविध प्रस्ताव दाखल करण्यासाठी पडताळा सूची देण्यात येईल, नागरिकांची सनद शिक्षण विभागातील प्रत्येक कार्यालयात लावण्याचे आदेश दिले जातील, आदिवासी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी देण्याच्या आदेश माननीय उच्च न्यायालय व माननीय कक्षा अधिकारी मंत्रालय मुंबई यांनी दिले आहेत त्यांना तात्काळ मान्यता देऊन वेतन निश्चिती केली जाईल,
तसेच मा.उच्च न्यायालयाने दिलेले एक स्तर संदर्भातील आदेश यांचे मार्गदर्शन प्रस्ताव मंत्रालय पाठवले जाईल, यावेळी शिक्षण आयुक्त साहेबांनी दोषी कर्मचारी अधिकारी यांना बडतर्फ, निलंबित केले जाईल असे आश्वासन दिले.या धरणे आंदोलना वेळी छात्रभारती संघटना यांनी देखील पाठिंबा दर्शवला व अनुदान टप्पा शिक्षक यांना दिला तर विद्यार्थ्यांची फी देखील कमी होईल अशी माहिती छात्रभारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष जयवंत भाबड, महिला अध्यक्ष रूपाली कुरुमकर, शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शाहू बाबर, तालुकाध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, रूपाली, बोरुडे, अकिल फकीर, राजेंद्र नवले, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.