युवा विश्वदेवेंद्र फडणवीस यांनी मदत करताना मला माझी जात विचारली नाही : भाजपचे...

देवेंद्र फडणवीस यांनी मदत करताना मला माझी जात विचारली नाही : भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांचं वक्तव्य

spot_img

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाज सध्या नाराज असल्याचं दिसत आहे. मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योध्दा’ मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करून राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र नेवासे तालुक्यातल्या ऋषिकेश शेटे पाटील या भाजपच्या युवा नेत्यानं भक्कमपणे फडणवीस यांची पाठराखण केली आहे. शेटे पाटील यांनी म्हटलं आहे, की राज्यात भाजपची सत्ता नसताना मुख्यमंत्री फडणीस यांनी मला माझी जात न विचारता मोठी मोलाची मदत केली.

ते म्हणाले, ‘जे सर्व मराठा मराठा करताहेत, त्यांच्यासाठी एकच सांगतो, माझ्यावर ३ खोट्या ॲट्रॉसिटी दाखल केल्या गेल्या. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हा एकही मराठा नेता किंवा मराठा मराठा ओरडणारा माझ्या मदतीला आला नाही. माझ्या वर्कशॉपवर अंदाधुंद गोळीबार केला गेला.

माझ्या ६ महिन्यांच्या मुलीवर गोळीबार झाला. मी ४ महिने खोट्या केसमध्ये त्याच काळात जेलमध्ये होतो. माझ्या घरी रोज गुंड पाठवले जायचे. घरच्यांना खूप त्रास दिला गेला‌. माझ्या मित्रांना त्रास दिला गेला. त्याचवेळी एकच व्यक्ती समोर उभी राहिली. कुठलीही मदत न मागता Devendra Fadnavis दर ४ दिवसाला अपडेट घेत त्यांनी माझ्या घरी कॉल केले.

फडणवीस यांनी पोलिसांना सांगितलं. मात्र सत्ता नव्हती पोलिस ऐकत नव्हते. तरीदेखील रात्री २ काय, पहाटे ४ काय, ऋषिला मी सोडवतो, काळजी करु नका, असा आत्मविश्वास फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाला दिला. मला जेलमध्ये संपर्क केला. फडणवीस यांचे हे उपकार मी मरेपर्यंत विसरणं शक्य नाही.

माझ्यावर आलेल्या संकटात एकही मराठा पुढे आला नाही. ना आंदोलन ना निवेदन, काहीच नाही. तरीही फडणवीस मैत्रीला जागले आणि आज फडणवीस यांच्यावर वाईट वेळ आली असताना त्यांना कस एकटं सोडू, असा सवाल उपस्थित करत शेटे पाटील म्हणाले, की देवेंद्र फडणवीस देव माणूस आहे. ज्याला कळेल त्याला कळेल. नेवासे तालुक्यातल्या सर्वांसाठी आपल्या इथला ‘राक्षस’ भाजपमध्ये घेत नाही. कारण तालुक्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होईल. फडणवीस यांचे इतके उपकार नेवासे तालुक्यावर आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...