लेटेस्ट न्यूज़देवाभाऊ! अहिल्यानगर जिल्ह्यात खरंच झालाय शिक्षणाच्या आयचा घो...! 'त्या' कॉपी सेंटरचे शाळेचे...

देवाभाऊ! अहिल्यानगर जिल्ह्यात खरंच झालाय शिक्षणाच्या आयचा घो…! ‘त्या’ कॉपी सेंटरचे शाळेचे पदाधिकारी अजूनही नामानिराळेच…! प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?

spot_img

देवाभाऊ! अहिल्यानगर जिल्ह्यात खरंच झालाय शिक्षणाच्या आयचा घो…! ‘त्या’ कॉपी सेंटरचे शाळेचे पदाधिकारी अजूनही नामानिराळेच…!
प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातलं ‘ते’ कॉपी सेंटर सध्या प्रचंड चर्चेत आहे. या कॉपी सेंटरमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षणाचा धंदा करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. या जिल्ह्यात खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या आयचा घो झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ यांनी या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पाथर्डी तालुक्यातल्या ‘त्या’ कॉपी सेंटरवर परीक्षा देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे, मुंबईसारख्या ‘मेगा सिटी’तले विद्यार्थी परिक्षा द्यायला येतात. याचाच अर्थ पाथर्डी तालुक्यातल्या त्या कॉपी सेंटरवर प्रचंड सावळा गोंधळ सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. शाळेचा निकाल चांगला येण्यासाठी या कॉपी सेंटरवर विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार करण्यात आलं आहे. यामध्ये शाळेच्या पदाधिकाऱ्यांचा नक्कीच सहभाग असल्याचा अंदाज आहे. एवढी सर्व उठाठेव फक्त शिक्षणाचा व्यवसाय करून बक्कळ पैसा कमावणे एव्हढाच आहे. आज पाथर्डी येथील कॉपी प्रकारावरून पाथर्डी सह अहिल्यानगर जिल्ह्याची संपूर्ण राज्यात बदनामी झाली आहे. तरीही ‘त्या’ कॉपी सेंटरचे शाळेचे पदाधिकारी अजूनही नामानिराळेच आहेत. पण या अशा विचित्र परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय, याचा कोणी तरी विचार करणार आहे का?

अनेक प्रामाणिक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करुन ‘डिस्टिंक्शन’मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विद्यार्थी रात्रंदिवस बौद्धिक कष्ट घेत असतात. परंतु बाहेरचे विद्यार्थी या कॉफी सेंटरवर परीक्षा द्यायला येतात आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आत्महत्येला कारणीभूत ठरतात. ही परिस्थिती कुठं तरी बदलली पाहिजे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा जो शिक्षण विभाग आहे, त्या विभागाकडे भरारी पथक आहे. मात्र ते भरारी पथक नक्की काय करतंय, हेच मोठं गौड बंगाल आहे. खरंतर या ‘सिस्टम’मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यानिमित्ताने अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला या सर्वांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा मौजे...

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ‘ शिवशाही ‘ हे नाव तातडीने हटवा..

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ' शिवशाही ' हे नाव तातडीने हटवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील...

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या अहिल्यानगर :...