दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं अक्षम्य दुर्लक्ष…! विवाहितेचा मृत्यू…! आमदार अमित गोरखेंनी केली कारवाईची मागणी…!
महासत्ता भारत / अहिल्यानगर
पिंपरी चिंचवडचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली यांना या बाळंतपणासाठी पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता आधी दहा लाख रुपये जमा करा. तरच ही अवघड शस्त्रक्रिया केली जाईल, असं सांगत या रुग्णालयाच्या प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे.
या रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्यात येऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार गोरखे यांनी केली आहे. यासंदर्भात विधानसभेच्या अधिवेशनात या रुग्णालयाच्या मनमानीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे, असंही आमदार गोरखे यांनी सांगितलंय.
