दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी -प्रतिनिधी, दिव्यांग फाउंडेशन आयोजित 100 दिव्यांग वधू वरांचा सामुदायिक विवाह सोहळा 8- 12 -2024 रोजी सकाळी 10ते 1-00 च्या दरम्यान आयोजित केलेला आहे,त्या निमित्तानं हळदी समारंभ 7-12-2024 रोजी 6-00 ते 10 या वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुना नगर निगडी या ठिकाणी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेने कार्यवाहक म्हणून खारीचा वाटा उचललेला आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक हेमंत (काका )हरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिल तांबे, डॉ धनंजय भिसे ,ज्येष्ठ नेते तथा मातंग चेतना परिषदेचे शहराध्यक्ष नानासाहेब कांबळे उद्योजक प्रसाद खंडागळे आयोजक हरीश सरडे बाळासाहेब कांबळे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेकडो दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले.