युवा विश्वदिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा नेता आमदार निलेश लंके : खासदार डॉक्टर अमोल...

दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा नेता आमदार निलेश लंके : खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे गौरवोद्गार!

spot_img

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी असताना देखील आमदार निलेश लंके हे लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या समाजकार्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने मानाचा मुजरा. कारण लाखोंच्या गर्दीचं नियोजन आमदार लंकेच्या कार्यकर्त्यांनी केलं. यापुढे जर आमदार निलेश लंके हे माझ्याबरोबर संसदेत आले तर सर्वसामान्य माणसाचा आवाज संसदेच्या सभागृहात घुमणार आहे. आमदार निलेश लंके हे दिल्लीच्या तक्ताला घाम फोडणारा नेता आहेत, असे गौरवोद्गार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढले.

डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचं आयोजन नगरमध्ये करण्यात आलं होतं. दिनांक एक ते चार मार्च दरम्यान या महानाट्याचं आयोजन केडगाव परिसरातल्या नेमाने इस्टेट या जागेवर करण्यात आला होतं. या महानाट्याला लाखो शिवप्रेमी नगरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महानाट्याचा दिनांक 4 मार्च रोजी समारोप झाला. त्यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित नगरच्या मनमोकळेपणाने जनतेशी संवाद साधला.

खासदार कोल्हे म्हणाले, की ‘महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही. आमदार लंके यांच्या माध्यमातून स्वाभिमानी महाराष्ट्राची तुतारी नगर दक्षिण मतदार संघात वाजले पाहिजे, यासाठी तुम्ही सर्वांनी त्यांना साथ द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. दरम्यान खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या या अपेक्षेचं उपस्थित नगरच्या जनतेनं टाळ्यांच्या कडकडात स्वागत केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...