गुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीच्या अंगावर घातला ट्रॅक्टर.... पत्नी ठार: कारेगाव येथील...

दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीच्या अंगावर घातला ट्रॅक्टर…. पत्नी ठार: कारेगाव येथील घटना, पतीला अटक

spot_img

दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीच्या अंगावर घातला ट्रॅक्टर…. पत्नी ठार: कारेगाव येथील घटना, पतीला अटक

श्रीरामपूर : दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, असे म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या घटनेत पत्नी ठार झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. सुशीला भवार (वय ३२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

शिवनाथ कारभारी भवार (वय ४०, रा. कारेगाव) हा बुधवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या दरम्यान मोटारसायकलवर जाऊन दारू पिऊन आला. त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर घेऊन दारू पिण्यासाठी निघाला. हे लक्षात आल्याने पत्नी सुशीला भवार यांनी पती शिवनाथ यास दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, असे म्हणत जाण्यास विरोध केला. पत्नीच्या विरोधामुळे शिवनाथ याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात ती ठार झाली.

याबाबत मयत सुशीला शिवनाथ भवार यांचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले (रा. कौठा, ता. नेवासा) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिवनाथ भवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यास अटक केली आहे.पुढील तपास पो.नि. दशरथ चौधरी हे करत आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी… राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी... राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री...

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अहिल्यानगर - महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य...

पिंपरी चिंचवडमध्ये रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार: आमदार अमित गोरखे यांचे आंदोलकांना आश्वासन ..

पिंपरी चिंचवडमध्ये रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार: आमदार अमित गोरखे यांचे आंदोलकांना आश्वासन पिंपरी, ता....