एक दारु विक्रेता एवढा मुजोर कसा झाला? त्याला एवढी मस्ती आलीय का? सामान्य माणसाला मारहाण करण्याची त्याची हिंमतच कशी होते? सहकारी पोलीस कर्मचाऱ्याकडे अशा प्रश्नांची सरबत्ती केलीय नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी. दारु विक्रेता सामान्य माणसाला मारत असेल तर अजिबात सहन करु नका. गुन्हा दाखल करुन त्याला अटक करा, असे स्पष्ट आदेश पीआय जाधव यांनी दिले आहेत.
ते म्हणाले, ‘गुन्हा करणारा कोणीही असला तरी त्याच्याविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. सामान्य माणसाला मारहाण करण्याची एक दारु विक्रेता यापुढे हिंमत करु शकणार नाही, अशा पद्धतीनं काम करा’.
पीआय जाधव यांच्या कार्यपद्धतीचं होतंय कौतूक…! – नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांशी ते प्रचंड आदर आणि आपुलकीने बोलतात. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट समजून सांगतात. एखाद्याने त्यांचा जास्त वेळ घेतला तरी ते चीड चीड करत नाहीत. पोलीस अधिकारी असल्याचा रुबाब ते अजिबात दाखवत नाहीत. सामान्य नागरिकांच्या हिताला ते सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यांच्या या कार्यपद्धतीचं नेवासे तालुक्यात कौतूक होत आहे.