दि. 08 जुन 2024 दिपक बाबासाहेब जरांगे (रा. मारवाडी गल्ली, ता. शेवगांव) हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असतांना अनोळखी 6 इसमांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि घरातील 1 लाख 08 हजार रुपये किंमतीचे सोन्या आणि चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेले.
तसंच शेवगाव शहरातल्या सातपुते गल्ली (ता. शेवगांव) येथील निवृत्ती कारभारी वाणी (वय 66, रा. सातपुते गल्ली, ता. शेवगांव) यांच्या घरातदेखील दरोडेखोरांनी चोरी करत 1 लाख 40 हजा रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी नेले बाबत. शेवगांव पो.स्टे. गु.र.नं. 509/2024 भादविक 397, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटना घडल्यानंतर राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना वर नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर अशांचे पथक नेमुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
सदर सुचनेप्रमाणे दि. 10/06/2024 रोजी स्थागुशा पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर घटना ठिकाणी कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींची काही एक माहिती मिळून येत नव्हती. त्यामुळे हे पथक शेवगांव परिसरात फिरुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली, की इसम नामे अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (रा. गोंडेगांव, ता. नेवासा) याने त्याच्या इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पहाणी केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे 2 संशयीत इसम उभे असलेले पथकास दिसले. त्यांना शिताफीनं ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (वय 40) व रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले (वय 19, दोन्ही रा. गोंडेगांव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करता ताब्यातील संशयितांनी त्यांचे इतर साथीदार अमर दत्तु पवार, कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले, दिपक इंदर भोसले सर्व (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) व सुनिल बाबाखॉ भोसले (रा. गोंडेगांव, ता. नेवासा) यांचे सोबत मिळुन 2-3 दिवसांपुर्वी शेवगांव परिसरात व 1 महिन्यापूर्वी चांदगांव, उस्थळ दुमाला, (ता. नेवासा) परिसरातील मेडीकल दुकान फोडून रोख रक्कम व पल्सर मोटार सायकल चोरी केल्याचं सांगितलं.
आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी अमर दत्तु पवार (वय 30) कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले (वय 21 दोन्ही रा. नेवासा फाटा, ता. नेवासा), सुनिल बाबाखॉ भोसले (वय 21, रा. गोंडेगांव, ता. नेवासा) हे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं.
आरोपी दिपक इंदर भोसले (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) (फरार) हा मिळून आला नाही. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, वैभव कलुभर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.