दिनांक 28/12/23 रोजी फिर्यादी विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय 45, धंदा नोकरी, रा. शेवगांव) हे नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बॅकेत देवून 10 लाख रुपये रोख रक्कम बॅगेत ठेवून मोटार सायकलवर जाताना पाठीमागून अनोळखी 2 इसम विनानंबर काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर येत फिर्यादीच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले आणि त्यांना तलवारीचा धाक दाखवून १० लाख बळजबरीनं चोरुन नेले.
याबाबत शेवगांव पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार (गु.र.नं. 1206/23 भादंविक 394, 34 प्रमाणे) गुन्हा दाखल आहे. सदर घटनेनंतर राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर यांना स्थागुशाचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी दि. 29/12/23 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रविंद्र कर्डिले, मनोहर गोसावी, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ मेघराज कोल्हे व भरत बुधवंत यांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना देवून पथकास रवाना केलं.
सदर सुचना प्रमाणे स्थागुशा पथक गुन्हा दाखल झाल्यापासून तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने संशयित आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान दिनांक 28/02/24 रोजी पोनि आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत आरोपी नामे चेतन तुजारे (रा. वरुर, ता. शेवगांव) याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो त्याच्या राहते घरी आहे, अशी माहिती मिळाल्यान पोनि आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास दिली.
शेवगांव पोलीस स्टेशन नेमणुकीचे अंमलदार धाकतोडे, गुंजाळ व पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करण्याच्या सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकानं लागलीच (वरुर ता. शेवगांव) येथे जावून आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना पथकास बातमीतील वर्णना प्रमाणे 1 इसम दिसुन आला. पथकाने संशयितास ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचं नाव चेतन प्रमोद तुजारे (वय 19, रा. वरुर, ता. शेवगांव) असे सांगितलं.
त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करता त्याने त्याचे इतर 2 साथीदारांची नावं समाधान तुजारे व अर्जुन तुजारे (दोन्ही रा. वरुर, ता. शेवगांव) अशांनी मिळून हा गुन्हा केल्याचं सांगितलं. आरोपीच्या साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे 2) समाधान विठ्ठल तुजारे (वय 20, रा. वरुर, ता. शेवगांव) हा मिळून आला. आरोपी नामे 3) अर्जुन ऊर्फ बाळू तुजारे (रा. वरुर, ता. शेवगांव) (फरार) हा फरार आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी नामे 1) चेतन प्रमोद तुजारे (वय 19, रा. वरुर, ता. शेवगांव) व 2) समाधान विठ्ठल तुजारे (वय 20, रा. वरुर, ता. शेवगांव) यांचेकडून चोरी करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल, चोरी केलेली असा एकूण 10,75,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.