चिंचवड – महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी राज्यातील तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या संरक्षण करण्याकरिता तृतीयपंथीयांचे कल्याण मंडळ यासाठी रूपये १० कोटी इतकी अतिरिक्त तरतूद करण्यात आली. आपल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले सोबतच तृतीयपंथी-सामाजिक दृष्ट्या मागासलेला घटक वंचितांच्या, शोषितांच्या व कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच समाजातील आणखीन एका घटकासाठी माणूस म्हणून उभे राहणे तो घटक म्हणजे तृतीयपंथी म्हणूनच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर तृतीयपंथींना सुद्धा राज्यभरात राज्य शासनासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीची संधी दिली पाहिजे, अशी ठाम मागणी केली.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथींनी भेट देऊन आमदार अमित गोरखे यांचा सन्मान केला.
समाजातील तृतीयपंथींचे जीवनमान चांगले व्हावे व एका साधारण नागरिकाप्रमाणे त्यांना ते जगता यावे, यासाठी अधिवेशनामध्ये मी घेतलेली भूमिका एक छोटासा प्रयत्न होता. पण सर्वार्थाने समाजातील तृतीयपंथींचा संघर्ष संपावा व शिक्षण तसेच नोकरी क्षेत्रात त्यांचा वावर सहज व्हावा यासाठी इथून पुढे ही मी प्रयत्नशील राहील असे यावेळी आ.अमित गोरखे म्हणाले.