राजकारणतृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरं, दुकानं आणि शाळा जाळल्या ; भाजपचे...

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरं, दुकानं आणि शाळा जाळल्या ; भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतलाय पक्ष कार्यालयातच आश्रय …!

spot_img

लोकसभेची निवडणूक होऊन निकालही जाहीर झाला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवडदेखील झाली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचीही निवड करण्यात आली. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. एवढं सारं होऊनदेखील बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसकडून अत्याचार सुरुच आहेत.

तृणमूल काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांची घरे, दुकान आणि शाळा जाळून टाकत आहेत. या सर्व अत्याचाराला कंटाळून स्वसंरक्षणार्थ भाजपच्या या कार्यकर्त्यांनी कुटुंबासह कोलकाता शहरातल्या मुरलीधर रोड परिसरात असलेल्या भाजप कार्यालयात आश्रय घेतला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या अत्याचारापासून आम्हाला वाचवावं, असं साकडं 170 भाजप कार्यकर्त्यांनी घातलं आहे.

भारत देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूक होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राग अजूनही गेलेला आहे. या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर अमानुष असे अत्याचार सुरु आहेत. या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी 10 जूनपासून भाजपच्या कार्यालयात आश्रय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात हल्ले करत आहेत. भाजपचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये अनेक जिल्ह्यात हिंसाचार होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी म्हटलंय, की ‘भाजप स्वतःच्या लोकांना कार्यकर्त्यांवर हल्ले करायला लावत आहे. लोकसभा निवडणूक जनतेनं भाजपच्या विरोधात निकाल दिला आहे. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडून हिंसाचाराचा अवलंब होत आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...