गुन्हेगारीतीन अपत्य प्रकरणी पदवीधर शिक्षक प्रकाश मरले यांना नोटीस..! अपात्रतेच्या मुद्यावर पाच...

तीन अपत्य प्रकरणी पदवीधर शिक्षक प्रकाश मरले यांना नोटीस..! अपात्रतेच्या मुद्यावर पाच एप्रिलला सुनावणी., दोन सहशिक्षिकांनाही म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा…

spot_img

पालघरः (योगेश चांदेकर)- डहाणू तालुक्यातील कासा केंद्रातील प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक प्रकाश हिरा मरले यांनी तिसरे अपत्य असल्याचे दडवून ठेवून ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक लढवली. याप्रकरणी आता विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. पाच एप्रिलला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

मरले हे एकदा नव्हे, तर दोनदा ठाणे-पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक प्रतसंस्थेवर निवडून आले. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या संस्थेचे मानधन त्यांनी घेतले. सहकार कायद्यानुसार 1 सप्टेंबर 2002 नंतर तिसरे अपत्य झाले असेल, तर संबंधित व्यक्तीला सहकारी संस्थेचे संचालक राहता येत नाही. असे असतानाही मरले दोन वेळा या संस्थेवर निवडून आले

‘महासत्ता भारत’चा दणका
या प्रकरणी तक्रारदार २०२२ पासून वारंवार पाठपुरावा करीत होते; परंतु त्यांची दखल घेतली जात नव्हती. ‘महासत्ता भारत’च्या हाती हे प्रकरण हाती आल्यानंतर वारंवार या प्रकरणाचा पाठपुरावा केला. हे प्रकरण धसास लावले. विभागीय सहनिबंधक कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेऊन आता चौकशी सुरू केली आहे.

या कायद्यानुसार नोटीस
याप्रकरणी राज्य निवडणूक आयोग, ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच विभागीय सहनिबंधाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. याप्रकरणी माध्यमातून मोठ्या प्रमाणात गवगवा आला आहे. विभागीय निबंधक कार्यालयातील विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी प्रकाश मरले तसेच तक्रारदारासह तिघांनाही नोटीसा बजावल्या आहेत. सहकार कायद्याच्या १९६० च्या कलम ७३ क अ फ ( ७) नुसार तीन अपत्य असल्याकारणाने ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक पद रद्द का करू नये अशी नोटीस भालेराव यांनी मरले यांना बजावली आहे.

तक्रारदारांनाही नोटिसा
या प्रकरणी दोन तक्रारदारांना तक्रारी संबंधित पुरावे व म्हणणे घेऊन पाच एप्रिलला सकाळी साडेअकरा वाजता विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणीसाठी बोलवले आहे. सहकार कायद्याच्या नियमानुसार एक सप्टेंबर २००२ नंतर तिसरे अपत्य झाले असल्यास संबंधितांना सहकारी संस्थेचे संचालक होता येत नाही. असे असताना मरले संचालक झाले. त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

अपात्रतेची टांगती तलवार
मरले यांना निखिल, निकिता व नेहा अशी तीन अपत्ये आहेत. त्यापैकी नेहाचा जन्म २९ मे २००४ चा आहे. त्यामुळे सहकार कायद्याच्या सुधारित नियमानुसार मरले हे शिक्षक पतसंस्थेची निवडणूक लढवू शकत नाही. ते निवडून आले असले, तरी त्यांना सहकार कायद्याच्या नियमानुसार अपात्र ठरवले जाऊ शकते?

जन्मतारखेचा दाखला उघडे पाडणार
या प्रकरणी मरले यांनी एक सप्टेंबर २००२ नंतर आपल्याला कोणतेही अपत्य झाले नसल्याचे सांगून कांगावा केला होता; परंतु त्यांना झालेल्या तिसऱ्या अपत्त्याचा दाखला नेहा ज्या शाळेत शिकते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहितीच्या अधिकारात मागितल्यानुसार हे दाखले दिले होते. हा मोठा पुरावा तक्रारदार शिक्षिका सादर करणार आहेत.

तीनही अपत्यांच्या जन्माचे पुरावे सादर करणार
मरले यांच्या तीनही अपत्याच्या जन्माचे दाखले तक्रारदारांच्या हाती लागले आहेत. ही तीनही अपत्ये ज्या शाळेत शिकत होती, तेथील मुख्याध्यापकानेच माहितीच्य़ा अधिकारात हे दाखले दिले असल्यामुळे ते खोटे असल्याचा दावा केला, तर संबंधित मुख्याध्यापक अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे जन्मतारखेचे खोटे दाखले देण्याचे धाडस कुणी करणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...