शहर विभागाचे डीवायएसपी अमोल भारती यांच्या पथकासह कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी तलवारी आणि अन्य शस्त्रास्त्रं घेऊन फिरत समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अहिल्या नगर शहरातल्या रिमांड होम, आयुर्वेद आणि अमरधाम परिसरात ही कारवाई करण्यात आली.
राजेंद्र गोलासिंग टाक (रा. संजयनगर काठवण खंडोबा) असं या कारवाईत अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली असून कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत तोफखाना पोलीस हद्दीतल्या तपोवन भागात एक व्यक्ती तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. तपोवन परिसरात एका इसमाला अटक करण्यात आली उत्कर्ष सुनील गाडे (रा. शिवनगर, सावेडी) असे त्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तलवारीसह आणखी एक शस्त्र जप्त केलं. तूच खाना पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत कायनेटिक चौक परिसरानजिक असलेल्या रेल्वे पुलाजवळ एक तरुण हातात कोयता घेत गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचं पोलिसांना समजलं. याप्रकरणी अक्षय भगवान खंडागळे (रा. अचानक चाळ रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतलंय. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.