राजकारण... तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील 'देवेंद्र गंगाधर फडणवीस'. पण...!

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

spot_img

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागू शकते. भारतीय जनता पक्षात वयाची 75 वर्षे पार केलेल्या नेत्याला सत्तास्थानी किंवा राजकारणात सक्रिय राहता येत नाही, असा अलिखित नियम आहे. हा नियम विचारात घेतला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या नियमाचं त्यांनी काटकरपणे पालन केलं तर पंतप्रधान मोदी या पदावरुन पायउतार होतील.

असं झालं तर पंतप्रधान मोदी यांच्यानंतर देशाचा कारभार पाहणारा किंवा भारतीय जनता पक्षाचा देशातला कारभार पाहणारा भक्कम नेता म्हणून देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाहिलं जातं. कारण फडणवीस हे राज्याच्या बाहेरदेखील राजकीयदृष्ट्या यशस्वी नेता आहेत. तोरसेकर यांच्या मतानुसार फडणवीस यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांची नावंदेखील पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहेत.

वास्तविक पाहता नरेंद्र मोदी यांच्या जवळचा नेता जर भाजपमध्ये कोण असेल तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात प्रथम घेतले जातात. कारण आंतरराष्ट्रीय अर्थकारणाची जी बैठक दावोस इथं होते, त्या बैठकीला अमित शहा, योगी आदित्यनाथ किंवा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्यापैकी पंतप्रधान मोदी कोणाला सोबत नेत नाहीत. या तिघांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी हे फडणवीस यांनाच या बैठकीला सोबत घेऊन जातात.

वास्तविक पाहता फडणवीस यांना राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन प्रतिस्पर्धी आले आहेत. अशा परिस्थितीत फडणवीस यांना राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला किमान 225 पेक्षा जास्त जागा मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यामध्ये फडणवीस जर यशस्वी झाले तर त्यांची वर्णी केंद्राच्या राजकारणात लागू शकते. 2029 मध्ये जे लोक जीवंत राहतील, त्या भाग्यवान लोकांना देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस झाल्याचं नक्कीच पाहायला मिळेल. अर्थात हे वाटतं तितकं सोपं नाही, हे वास्तव कोणालाच नाकारता येणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...