ब्रेकिंग... तर नगर अर्बन बँकेसारख्या अनेक संस्था बंद पडत राहणार...! वाचा सविस्तर...

… तर नगर अर्बन बँकेसारख्या अनेक संस्था बंद पडत राहणार…! वाचा सविस्तर आणि घ्या जाणून वस्तुस्थिती…!!

spot_img

स्व. रावबहाद्दूर चितळे, स्व. भाऊसाहेब फिरोदिया, स्व. मोतीभाऊ फिरोदिया,
स्व. नवनीतभाई बार्शीकर, स्व. झुंबरलालजी सारडा, स्व. सुवालालजी गुंदेचा यांनी नगर अर्बन बँकेवर त्यांच्या काळात एकहाती वर्चस्व गाजविल. परंतू कर्जदाराला कर्ज देताना त्याला कायम म्हणायचे, ‘अरे दोन लाख कशाला पाहीजेत? एक लाखात काम चालेल तुझं. कशाला जास्त व्याज भरतो’?

परंतु दुर्दैवानं 2014 पासून एक भ्रष्टाचारी चेअरमन आणि त्याच्या भ्रष्टाचारी टोळक्यांच्या ताब्यात बँक गेली आणि त्यानंतर कर्जदारांना सांगितलं जायचं, ‘अरे दोन कोटी काय घेतो? 10 कोटी घे. फक्त आम्हाला काहीतरी दे’. यांना काही तरी देणारे कर्जदार आणणाऱ्या दलालांना मोठं कमिशन दिलं जायचं.

पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटींचं बोगस कर्ज आणून त्या 22 कोटीतले 11 कोटी यांना देणारा कर्जदार शोधून आणला म्हणून एका दलालाला तब्बल 75 लाखाची बक्षीसी दिली होती यांनी. आता ही बक्षीसी खात्यात ट्रांन्सफर झाली म्हणून कळलं. पण जे कमिशन रोख दिलं जायचं ते कसे कळणार?

300 कोटींच्या घोटाळ्यात 72 कोटी रुपये रोखीने गायब झाले आहेत. हे भामटे होते, हे जगजाहिर झालं. परंतू भामट्यांच्याच हातात सत्ता देणारे पण तेवढेच दोषी आहेत. आर्थिक संस्थेची सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची, याबाबत गांभिर्यानं विचार केला नाही तर चांगल्या संस्था एक एक करून बंद पडतील, हे नक्की.

मतदान करताना नाते गोते, गोड बोलणे, खाऊ पिऊ घालणे, याचाच विचार केला तर अवघड आहे. संस्था उभ्या करायला फार कमी जण असतात. परंतू तीच संस्था जोरात आली, की त्या संस्थेवर ताबा मारायला भरपूर गोळा होतात, हे कटू सत्य आहे. यापुढे योग्य काळजी घेतली नाही तर नगर अर्बन बँकेसारख्या चांगल्या संस्था अशाच बंद पडत राहणार आहेत.

लेखक :

राजेंद्र गांधी
बँक बचाव समिती
मो. नं. 9423793321

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...