फलटण एज्युकेशनच्या तरडफ प्राथमिक व माध्यमिक हायस्कुलच्या १९९३ ची इयत्ता १० वी च्या बॅचच्या ३५ विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर तब्बल 3१ वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं. या मेळाव्यात शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला.
करिअरच्या मागे धावत असताना बॅचमधील मित्र- मैत्रिणींना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. गेट टुगेदरच्या वेळीं शिक्षक वर्ग व विद्यार्थी एकत्र पाहून असं वाटलं, की
आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आली.
वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या आपण सर्वांनी अध्यात्मताकडे थोडं तरी वळलं पाहिजे तसेच प्राण्यांची सर्वांनी काळजी घ्यावी. जेणेकरुन निसर्गाचा समतोल राखला जाईल,
असा मोलाचा विचार स्वाती शिंदे हिने मांडला.