गुन्हेगारीड्रिम कन्ट्रक्शनच्या हालगर्जी पणामुळे तलवाडा येथे आपघाताची मालीका सरुच! बग्गेवाडी येथील...

ड्रिम कन्ट्रक्शनच्या हालगर्जी पणामुळे तलवाडा येथे आपघाताची मालीका सरुच! बग्गेवाडी येथील शेख ईनूस या तरुणाचा रमजानच्या ऊपवासात अपघाती मृत्यु.. पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला जमावाने पकडून मारहण न करता पोलीसांच्या स्वाधीन केले.

spot_img

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यात गत काही वर्षापुर्वी बागपिंपळगाव ते तलवाडा मार्गे टाकरवण राज्य रस्ता क्रमांक ५० चे रुंदी व डांबरी करनाचे काम ड्रिम कन्ट्रक्शनच्या माध्यमातुन करण्यात आले होते. हे काम करत आसतांना संबधित गुत्तेदाराने गाव पढा-यांच्या सांगावांगी वरुन रस्ता कामात काट कसर करत कुठेही आपघाती वळनाचे फलक न लावल्याने वारंवार राज्य रस्ता क्रमांक ५० अंबिका नगर बस थांबा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तलवाडा या ठिकाणी शंभर मिटरच्या अंतरावर दोन आपघाती वळण आसल्याने व या ठिकाणी कसल्याही प्रकारचे सुचना फलक नसल्याने ऐवड्या जागेत सातत्याने ड्रिम कन्ट्रक्शनच्या या हालगर्जीपणा मुळे आपघाताची मालीका सरुच आसल्याचे आजच्या घटने वरुन दिसून येते.

या बाबत अधिक माहीती आशी की भरधाव ट्रकने मोटर सायकल स्वारास उडविल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास तलवाड्यातील एक मिनार मस्जिद समोरून जाणा-या राज्य रस्ता क्रमांक ५० येथे घडली. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला जमावाने मारहण न करता पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. गेवराई तालुक्यातील तलवाड़ा पोलीस ठाणे हद्दीतील बग्गेवाडी येथील शेख ईनूस(वय ३२) हा तरुण दुपारची नमाज अदा करून मोटर सायकलवर गावाकडे निघाला असतांना समोरून येणाऱ्या १२ टायरच्या ट्रक क्र.एम.एच.२३.डब्ल्यु. ९४०० ने शेख ईनूस यांच्या मोटर सायकलीस जोराची धडक दिली.

या अपघातात शेख ईनूस उस्मान यांचा जागीच मृत्यू झाला. रमाजानचा उपवास असलेल्या शेख ईनूस यांच्या अपघाती मृत्यूनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याचे दिसून आले. परंतु रमजानच्या महिन्याचे पावित्र्य राखत भावनेला आवरघालत कुणीही ट्रक चालकास मारहण केली नाही. घटनेची माहिती कळताच तलवाडा पोलिस स्टेशनचे सपोनि

सोमनाथ नरके आपल्या सहका-यासह घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रक चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आसल्याचे दिसून येत होते. उपस्थित जमावाने चालकास पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले.होते मृत्य तरुणाचे शव प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळ ७ वाजे पर्यंत उपलब्ध होते. बातमी प्रकाशित होई पर्यंत तलवाडा पोलिसांनी कसल्याही प्रकारची माहीती दिली नव्हती.

सदर ट्रक हे वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे अशी चर्चा घटना स्थळी लोकांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...