युवा विश्वटँकरच्या पाण्यातली भ्रष्ट शेवाळं...! भाग : ४ था

टँकरच्या पाण्यातली भ्रष्ट शेवाळं…! भाग : ४ था

spot_img

महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीचं उल्लंघन करुन भ्रष्टाचारी लोक दुष्काळी जनतेच्या पिण्याच्या पाण्यात पाप करतात. ते थांबवणं खरं तर सुज्ञांच कर्तव्य आहे. शासन नियमाप्रमाणे दैनिक / साप्ताहिक जि. पी. एस. अहवाल अभिलेखात जतन करुन ठेवण्याची जबाबदारी जिल्हा टंचाई कक्ष व प्रत्येक BDO ची आहे. मात्र सर्रासपणे उल्लंघन केलं जातं.

त्यासाठी सूज्ञ नागरिकांनी वेळोवेळी माहिती अधिकार अर्जाद्वारे साप्ताहिक जी.पी.एस. अहवाल मागणी करायला हवीय. टँकर मालकाला जे मासिक भाडे ठेकेदार सध्या देत आहेत त्या मध्ये प्रामाणिक पाणी वाहतूक होवूच शकत नाही. म्हणून कायद्याने चोरांना अद्दल घडवली पाहिजे.

जनता तहानेने व्याकूळ, टँकर मालक अर्धपोटी आणि मस्तवाल लोकांची मात्र चंगळ असते. परवा पाथर्डीचे ट्रक मालक सखाराम खेडकर दादा ZP मध्ये भेटले. सन २०१८ पासून टँकर ठेकेदाराने त्यांच्या वाहतुकीचे पैसे दिलेले नाही. सतत तक्रार अर्ज घेवून फिरतात. मात्र कोणीही दाखल घेत नाही. गाडीही विकून टाकली म्हणाले. ऐकून खूप वाईट वाटलं. असे अनेक पिडीत लोकं आहेत.

ठेकेदारांना मात्र नवनवीन सावज सापडतात आणि लोकंही सहज फसतात. हे कुठं तरी थांबायला पहिजे. दक्ष नागरिक, व स्वयंसेवी कार्यकर्ते यांनी स्वतःहून सदर प्रकरणाचा अभ्यास करावा. सतर्क राहून जनतेला पाणी मिळवून द्यावं आणि भ्रष्टाचाऱ्यांना वठणीवर आणावं. आपणास आमच्याकडून योग्य ते सहकार्य केलं जाईल.

संकलन : 
पोपट सूर्यभान आघाव
Watsapp नं. ८२७५२०१३२१
मो.नं. ७५१७२००२००

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...