कीर्तन असो किंवा प्रवचन असो, कुठल्याही प्रकारचं मानधन न घेणारे, निःस्वार्थ, निःस्पृह, अनासक्त व्यक्तिमत्त्व असलेल्या ह.भ.प. देवीदास म्हस्के यांची नेवाशातल्या ज्ञानेश्वर मंदीर संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली. निर्जला एकादशीच्या दिवशी (दि. १८) त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला.
कार्यक्रम पत्रिकेचा मुद्दा गाजला सोशल मिडियावर…!
हभप म्हस्के यांच्या निवडीला नाही. पण यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेत राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींच्या नावाला नेवासे तालुक्यात प्रचंड विरोध झाला. सोशल मिडियावर त्याचे पडसाद उमटले.
नेवासकरांनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास…!
विद्वत्ता, व्यासंग, अभ्यास, साधना, सांप्रदायिक निष्ठा, मूल्ये, सांप्रदायिक संस्काराप्रती कृतज्ञता
हे सर्व माऊलींच्या हृदयानं, स्वामी विवेकानंद यांच्या तळमळीनं आणि गुरुंच्या कृपाशिर्वादानं हभप म्हस्के महाराज ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, विश्वास तमाम नेवासकरांमधून व्यक्त केला जात आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून भगवद् गीता आणि ज्ञानेश्वरीचा महिमा जगभरात जावी…!
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रीमद् भगवद्गीतेवरची टीका म्हणजे विश्लेषणात्मक लिखाण आहे, असं म्हटलं जातं. आजच्या तरुणाईनं या दोन्ही ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे. हल्ली प्रत्येक तरुणाच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये इंटरनेट आहे. यामध्ये गुगल हे जागतिक सर्च इंजिन असलेला प्लॅटफॉर्म म्हणजे माहितीचा खजिना आहे. या गुगल आणि इंटरनेटचा वापर करुन या दोन्ही महान ग्रंथाचा महिमा जगभरात जावा आणि हे कार्य हभप म्हस्के महाराजांच्या हातून व्हावं, अशी अपेक्षा नेवासकरांमधून व्यक्त केली जात आहे.