ब्रेकिंगजिल्हाधिकारी आणि अवसायक यांच्यासोबतची बैठक यशस्वी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदार प्रतिनिधींची ;...

जिल्हाधिकारी आणि अवसायक यांच्यासोबतची बैठक यशस्वी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदार प्रतिनिधींची ; वेगवान वसुलीसंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांशी चर्चा करु : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची ग्वाही

spot_img

जिल्हा प्रशासन प्रमुख या नात्यानं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि अवसायक यांच्यासमवेत नगर अर्बन बँकेच्या ठेवीदार प्रतिनिधींशी आज (दि. ५) दुपारी एक वाजता यशस्वी बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही संपूर्ण केस चांगल्या पध्दतीनं समजून घेतली.

ठेवीदारांच्या प्रतिनिधींनी नमूद केलेले सर्व मुद्दे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नोंद करुन घेतले. बँक बचाव समितीकडून काही माहितीही त्यांनी मागविली आहे. त्या माहीतीचे आधारे व जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क करुन ठेवीदारांसाठी सकारात्मक उपाय आणि कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले.

या बैठकीमुळे ठेवीदार प्रतिनिधींमध्ये त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी नक्की परत मिळतील, असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान, या ठेवींची वसुली घोटाळेबाज संचालकांची मालमत्ता जप्त करण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

फरार विजय मर्दाला ‘लूक आऊट’ नोटीस जारी…!

नगर अर्बन बँकेच्या हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाला सध्या चांगल्याप्रकारे गती आली आहे. या घोटाळ्याचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ असलेला चार्टर्ड अकाउंटंट आणि नगर अर्बन बँकेचा तज्ञ संचालक विजय मर्दा हा अनेक दिवसांपासून फरार आहे. तो विदेशात पळून जाऊ नये, यासाठी नगर जिल्हा पोलीस यंत्रणेनं त्याच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...