लेटेस्ट न्यूज़जाविद मुश्ताक शेख सर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे..

जाविद मुश्ताक शेख सर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे..

spot_img

जाविद मुश्ताक शेख सर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे..

मनमाड :- छत्रपती शिवाजी महाराज चौक,मनमाड येथील एच.डी.एफ.सी.बँकचे ए. टी.एम. मधून अचानक बाहेर आलेले दुसऱ्या खातेदाराचे ९७ हजार रुपये मनमाड क्रिकेट असोसिएशन चे सचिव व एच.ए.के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज चे कर्मचारी तथा प्रसिद्धी प्रमुख जावेद मुश्ताक शेख सर यांनी मूळ मालक श्री. रमेश गांधी यांना प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या माणुसकी चे कौतुक होत आहे.माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण जावेद शेख यांनी दाखवून दिले. छत्रपती शिवाजी चौक, मनमाड येथे एच डी एफ सी च्या ए.टी.एम. मध्ये पैसे काढायला गेले होते .त्यांनी ए.टी.एम. मध्ये आपला कार्ड टाकताच अचानक बँक प्रोसेस होण्या आधी ए.टी.एम.मधून 97 हजार रुपये बाहेर आले .हे पाहून जावेद सरांना आश्चर्य वाटले.त्यांनी लगेच त्यांचे मित्र फुले, शाहू, आंबेडकर मंचचे कार्याध्यक्ष तथा समन्वयक नाशिक जिल्हा संभाजी ब्रिगेडचे समन्वयक फिरोज शेख यांना या बाबत माहिती दिली. फिरोज शेख यांनी जावेद शेख यांच्या सोबत ए.टी.एम मध्ये आधी येऊन गेलेल्या खातेदारांचा शोध घेतला .तेव्हा ही रक्कम व्यापारी रमेश गांधी यांची असल्याचे लक्षात आले. फिरोज शेख यांनी गांधींना कॉल करुन जावेद शेख यांच्याकडे पाठवून 97 हजार रुपये त्यांना परत केले .याबद्दल रमेश गांधी यांनी जावेद शेख सर यांचे आभार मानून कौतुक केले. जावेद शेख सरांनी दाखविल्याबद्दल जावेद शेख सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जाविद शेख हे फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे मार्गदर्शक शेख मुश्ताक सर यांचे चिरंजीव आहे.

शेख जाविद मुश्ताक
सचिव मनमाड क्रिकेट असोसिएशन,मनमाड जि
नाशिक

प्रसिद्धी प्रमुख
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड जि. नाशिक

मो. 9850755252

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

 जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय;  सामाजिक समतेच्या दिशेने एक ठोस पाऊल! – आमदार अमित गोरखे 

जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय;  सामाजिक समतेच्या दिशेने एक ठोस पाऊल! - आमदार अमित गोरखे  आज...

अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार..! आठवीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण; प्रकरण मिटले होते पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण...

अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार..! आठवीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण; ...

⚫⚫ मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला; पहेलगाम हल्ला पाकिस्तानचच षडयंत्र, केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती...

⚫⚫ मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद... घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला; पहेलगाम हल्ला पाकिस्तानचच...

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती मुंबई...