राहुरी तालुक्यातल्या ताराबाद इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आला आहे. या घटनेत प्रकरणी राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलींना पळवून नेण्यात आल्यामुळे राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन अल्पवयीन मुलींना पळून नेल्या प्रकरणे एका 35 वर्षीय महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिरायला दिली आहे. फिर्यादी महिलेची पंधरा वर्षाची एक मुलगी आणि तिच्या नणंदेची सतरा वर्षांची एक मुलगी अशा दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आला आहे. दिनांक 17 मे रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी भादंवि 363 नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुरी पोलीस मुलींचा शोध घेत आहेत.