राहुरी तालुक्यातल्या मौजे रामपूर इथल्या गट क्रमांक 372 / 2 क्षेत्र 60 आर. इतकी शेत जमीन असून त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचं नाव आहे. सदरचं नाव हे कमी करायचं राहिलं असल्यामुळे तसं पत्र तलाठी रामपूर यांना देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1 हजार 500/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली.
सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी इथं स्विकारल्यानं सुनील भागवत भवर (वय- 46 वर्षे, पद- महसूल सहायक, वर्ग – 3,
नेमणूक – शासकीय वसुली विभाग, तहसील कार्यालय राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर
रा. आशिर्वाद बंगला, शेडगे मळा, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर,जि. अहमदनगर) या लोकसेवकाविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घार्गे – वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.नं. 93719 57391), माधव रेड्डी (अप्पर पोलिस अधिक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049) आणि
नरेंद्र पवार (वाचक पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288) यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी
श्रीमती छाया देवरे, (पोलीस निरीक्षक, लाप्रवि, अहमदनगर
मो. न. 8788215086), पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर मो.नं.797254720) यांच्यासह सापळा पथक पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई सचिन सुद्रुक, चालक पोलीस अंमलदार दशरथ लाड यांनी केली.