नगरच्या प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे नगर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी असलेले सुमित वर्मा, अनिकेत शियाळ आणि घनश्याम बोडके, महेश निकम, सागर ढुमणे या हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र स्थानिक अहमदनगर महानगरपालिका प्रशासनानं यासाठी आक्षेप घेत त्याठिकाणी अतिक्रमण आणि पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
स्थानिक महानगरपालिका प्रशासनानं यासाठी आक्षेप घेत त्याठिकाणी अतिक्रमण आणि पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर याप्रकरणी नगरच्या कोर्टात खटला पाठविला. अनेक दिवस या खटल्याचं काम सुरु होतं. दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या निर्दोष मुक्तता केली.
या पुतळ्याची कुठलीही विटंबना झाली नाही तसंच याठिकाणी अतिक्रमण झालं नसल्याचं कोर्टाच्या निदर्शनात आलं. त्यामुळे वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या खटल्याचं कामकाज ॲडव्होकेट मनिष बाळासाहेब केळगंद्रे यांनी पाहिलं. तर ॲडव्होकेट अविनाश बी. खामकर, ॲडव्होकेट पी. व्ही. भुयार यांनी त्यांना सहकार्य केलं. या खटल्याच्या सुनावणीकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.