युवा विश्वचांगलं शिक्षण घ्या आणि परिसराचं नाव उज्वल करा : सामाजिक कार्यकर्ते...

चांगलं शिक्षण घ्या आणि परिसराचं नाव उज्वल करा : सामाजिक कार्यकर्ते मयुर बांगरेंचं प्रतिपादन…!

spot_img

आज समाजातले अनेक घटक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मुलांच्या उज्वल भविष्यास घडविण्याचं काम शाळेच्या माध्यमातून होत आहेत. हे शिक्षण घेत असतांना अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. ही जाणीव ठेवूनच वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप स्वरुपातली ही छोटीशी मदत आहे. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन, शाळेचे परिसराचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन आराध्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बांगरे यांनी केलंय.

आराध्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बांगरे (बालीशेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वेस्टेशन येथील मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी निलेश बांगरे, दिपक लोंढे, कुमार डाके, अभय रणदिवे, संदीप भगोरे, अमोल रणदिवे, पंडित खुडे, शरद वाकचौरे, सचिन पवार, मुख्याध्यापक घिगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी दिपक लोंढे म्हणाले, बालीशेठ बांगरे यांच्या सामाजिक कार्यात नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी कायम तत्पर राहून ते सोडवतात. त्याचबरोबर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिला बचत गटांना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, अशा सर्वांसाठी ते नेहमी कार्यरत आहेत.

यावेळी मुख्याध्यापक घिगे यांनी या शाळेत सर्वसामान्य व गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धा, परिक्षांसाठीही मार्गदर्शन केलं जात असल्याचं सांगून आभार मानले.

यावेळी शिक्षक सर्वश्री आठरे, श्रीमती शिंदे, कवडे, लोंढे आदींसह पालक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...