ब्रेकिंगघराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार... प्रधानमंत्री सूर्यघर...

घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार… प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

spot_img
घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार…
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’त ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. रूफ टॉप सोलार वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व घरगुती वापरासाठी ती वीज वापरावी, अशी ही योजना आहे. गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल येत नाही. अहिल्यानगर शहरातील १२०० मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन ते हरीत ऊर्जा निर्माते झाले आहेत. त्यामुळे इतर मालमत्ताधारक नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणारी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून रूफ टॉप सोलार सिस्टिमसाठी केंद्र सरकार वीज ग्राहकाला एक किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान देत आहे. वीज ग्राहकाला जास्तीत जास्त ७८ हजार रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना सोलार सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण सहाय्य करीत आहे. त्यासाठी ‘पीएम सूर्यघर’ या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. याच नावाचे मोबाईल ॲपही उपलब्ध आहे.

छतावरील १ किलोवॉट क्षमतेच्या सोलार सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दोनशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेची सोलार सिस्टीम पुरेशी आहे. त्यातून दरमहा सुमारे २४० युनिट वीज निर्मिती होते. २५० ते ३५० युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी ३ किलोवॉट क्षमतेची सिस्टीम पुरेशी ठरते. त्यातून दरमहा ३६० युनिट वीज निर्मिती होते. एकदा सोलर बसल्यानंतर २५ वर्षांपर्यंत वीजनिर्मिती होते. ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजने’साठी अनुदान दिले जात आहे. या योजनेमुळे नागरिकांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुंबई,...

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी पुणे:...

ब्रेकिंग – जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान

जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान... PSI राजेंद्र वाघ...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...