कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना अहमदनगर शहरातल्या झेंडीगेट परिसरात हॉटेल मिराचे मागे, पिंज-या जवळ, लिंबाच्या झाडाखाली सोहेल कुरैशी हा गोवंश जनावरांची कत्तल करुन त्यांच्या मांसाची विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाली. पो.नि. दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना नमूद ठिकाणी पंचासह जाऊन छापा टाकुन कारवाई करणेबाबत आदेशित केले.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी पंचासह जाऊन दुपारी दोन वाजता छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत अंदाजे 250 किलो गोवंश मांस, एक लोखंडी तराजू, एक लोखंडी 500 कि.ग्रॅ. वजनाचे माप, एक लोखंडी सत्तुर असा एकून 50 हजार 750/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. नमूद कारवाईत सोहेल जावेद कुरैशी (रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) याच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 406/2024 भा.दं.वि.क. 269) सह महा. प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे दि. 27/03/2024 रोजी 16.18 वा. गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहमदनगर शहर विभाग) अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोहेकों तनवीर शेख, पो. ना. अविनाश वाकचौरे, पो.कॉ. दिपक रोहोकले पो. कॉ. सत्यजित शिंदे, पो. कॉ. तानाजी पवार, पो. कॉ. सुरज कदम, पो. कॉ. अतुल काजळे, पो. कॉ. महेश पवार, पो. कॉ. सुजय हिवाळे यांनी केली.