गुन्हेगारीगोवंशीय जनावराच्या बेकायदेशीर वाहतुक करणारा पिकअप शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे ताब्यात; कोतवाली...

गोवंशीय जनावराच्या बेकायदेशीर वाहतुक करणारा पिकअप शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे ताब्यात; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

spot_img

गोवंशीय जनावराच्या बेकायदेशीर वाहतुक करणारा पिकअप शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे ताब्यात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर – दि.१२ रोजी पहाटे ०५.४५ वाजण्याचे सुमारास शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब बोरसे सो यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील कोटला बस स्टैण्ड परिसरामधून अज्ञात इसम हा महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांची कत्तल करुन त्यांचे मास विक्री करण्याची बंदी असताना सदर कत्तल करण्याकरीता गोवंश जातीचे गाय वासरे अशी जनावरे पिकप बाहनामधून घेवून वाहतुक करत आहे.

अशी माहिती मिळाल्याने त्यांनी शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे वाहतुक नियमाचा भंगाच्या केसेस करणा-या पथकातील अमलदार सफी/मन्सुर सय्यद, पोकों/मधुकर ससे चापोको अतुल लगड यांना सदरबाबत माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

त्याप्रमाणे सदर पथकातील अमलदार यांना वाहतुक नियमाचा भंगाच्या केसेस करीत असताना कोठला परिसरातून मंगलगेट हवेली मार्ग कोठला झोपडपटटी कडे जाणारे रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढ-या रंगाचा महोद्रा कंपणीचा बोलेरो एक पिकअप क्रमांक एमएच ०४.ई वाय. ११०१ संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने सदर पिकअप वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव शहानुर रहेमान सय्यद बय-३४वर्षे रा.बारेईमाम कमाणी जवळ अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.

त्यास त्याचेगाडीमधील काय माल असल्याबाबत विचारपुस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या पिकअप वाहनामध्ये ६५०००/-रु किमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरे असे पांढ-या रंगाचा पिकअप असा एकुन २,६५०००/-रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याचेविरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं १००८/२०२४ भादंवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) (क).९ (अ) प्रमाणे पोकों अतुल काजळे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोना अब्दुलकादर परवेज इनामदार हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सफी/ मन्सुर सय्यद, पोकों/मधुकर ससे चापाकॉ अतुल लगड यांनी केली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...