गोवंश जातीच्या प्राण्यांच्या मांसाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या आठ गुन्हेगारांविरुद्ध पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी हद्दपारची कारवाई केली आहे. दरम्यान, यापुढील काळातदेखील गुन्हेगारांचे अभिलेख पडताळून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत एम पी डी ए कायद्यानुसार स्थानबद्धतेची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
लोकसभेची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असं गुन्हेगारी कृती करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार कॅम्प देवळाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संजय तुकाराम पाळंदे, संतोष मुरलीधर गीते (दोघे रा. शिंगवे बहुला देवळाली कॅम्प, नाशिक), विकास इकबाल चौधरी, शहाबाज इकबाल चौधरी (दोघे रा. पिंजरपाडी, जुने नाशिक), फरान सुलतान शेख (द्वारका, भद्रकाली, नाशिक) यांच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.