नगर – दरवर्षी मोठ्या उत्सहात होणारी महाशिवरात्री यात्रा उत्सव नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर आयोजित करण्यात आला होता यानिम्मिताने दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झाले.
गोरक्षनाथ गडावर महाशिवरात्रीला आदल्या रात्रीपासून रात्री १२ वा पासून उत्सव सुरु झाला ,हजारो वर्षाची हि परंपरा आहे नवनाथ भक्तिसार मध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे.
वांबोरी,कात्रड,मांजरसुंभा,पाची महादेव वस्ती या ठिकाणचे हजारो युवकांनी प्रवरा संगमाला जाऊन कावडीने पायी आणलेले गंगाजल रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यत गडावर घेऊन येऊन देवाला गंगाजल अर्पण केले यावेळी रात्रीच्या काळोखात गर्भगिरी डोंगरात यावेळेस ओम शिव गोरक्ष,हर हर महादेव चा जयघोषने परिसर दुमदुमून जातो.
स.७ वा.श्री अभिषेक, पूजा व महाआरती संपन्न झाली नंतर भजने,किर्तन नाथभक्त मंडळींनी म्हटली,तसेच दूध,केळी,फळे,लाडू,साबुदाणा खिचडीचा फराळ-महाप्रसाद भाविक भक्तांना दिवसभर अनेक भाविकांच्या वतीने वाटप केला गेला.
यात्रा उत्सवाला श्री गोरक्षनाथ गडावर मोठ्या संख्नेने भाविक आले होते यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या रात्री उशिरापर्यंत व दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या तसेच मांजरसुंभा फाटा ते गडापर्यंत अनेक दुकानदार दुकाने लावली होती.
यावर्षी भडारा,महाप्रसाद करणार्यांनी मंदिराच्या खालच्या हॉल मध्ये सोय करण्यात आली होती,यात्रेचे नियोजन अध्यक्ष ऍड शंकरराव कदम तसेच विश्वस्त, कार्यकारी मंडळ व गावकर्यांनी केले होते.