गुन्हेगारीगॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा...

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल..!

spot_img

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल

अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत गॅस पाईपलाईनचे कामकाज चालू करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून ठेकेदाराकडे खंडणीची मागणी करणार्‍या दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा (वय 30 हल्ली रा.पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमनाथ कराळे (पूर्ण नाव नाही, रा.नागापूर, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्या विरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे 5 ऑक्टोबर रोजी कामानिमित्त एमआयडीसीतील कार्यालयाच्या बाहेर उभे असताना सोमनाथ तेथे आला. तो फिर्यादीला म्हणाला, गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रक्टर तुम्हीच का? तुम्हाला एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला माझ्या परवानगी शिवाय कामकाज चालू करता येणार नाही. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले, तुम्हाला पैसे का द्यायचे त्यानंतर सोमनाथने फिर्यादीला शिवीगाळ करून मी या गावचा दादा आहे, तु मला पैसे दिले नाही तर मी तुझे कामकाज चालू देणार नाही तसेच तुझ्या कामगारांना मारहाण करून त्यांना पळवून लावेल, असे म्हणून तो तेथून निघून गेला.

सदर घटनेचा अधिक तपास पोना.जी.के.पालवे हे करीत आहेत.

एमआयडीसी तील गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हायला हवी – उद्योजकांची मागणी
अहील्यानगर एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना स्थानिक गुंडांकडून नेहमीच मारहाण करणे, त्यांची आर्थिक लूट करणे अश्या प्रकारच्या घटना घडत असतात. अश्या परिस्थितीत एमआयडीसी मध्ये काम करण्यासाठी कामगार येण्यास इच्छुक नसतात, त्यामुळे येथील उद्योजक सुध्दा त्रस्त झाले आहेत. यासाठी एमआयडीसी भागात दहशत निर्माण करणाऱ्यांवर टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्कांतर्गत कारवाया करून एमआयडीसी दहशत मुक्त करावी तरच नगर चे उद्योग वाढतील व नवीन उद्योग नगरमध्ये येतील व बेरोजगारांना रोजगार मिळेल.

भ्रष्टाचारात एमआयडीसी प्रशासन नेहमीच बदनाम..
नागापूर एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्याला काही दिवसांपूर्वीच एक कोटीची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. यावरून हे कार्यालय किती मोठ्या प्रमाणात साखळी पद्धतीने भ्रष्टाचार करत आहे हे दिसून येते व तो भ्रष्टाचार अजूनही चालूच आहे. एमआयडीसी मध्ये विविध प्रकारचे काम करणाऱ्या ठेकेदारांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे, अगदी काही दिवसांपूर्वीच या कार्यालयात लाच लुचपत विभागाचा सापळा अयशस्वी झाला पण तो पुन्हा यशस्वी होऊ शकतो.
हेच भ्रष्ट अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे स्थानिक गुंडांना विविध प्रकारचे टेंडर देऊन गुन्हेगारांचा एमआयडीसी मध्ये हस्तक्षेप वाढवत आहे. या कारणांचा स्थानिक उद्योजकांवर परिणाम होत आहे. त्यासाठी एमआयडीसी कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सुध्दा कारवाई होणे अपेक्षित आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल…

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल... यशस्वी सापळा...