लेटेस्ट न्यूज़गांजासह आरोपी जेरबंद ; अहिल्यादेवीनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गांजासह आरोपी जेरबंद ; अहिल्यादेवीनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

spot_img

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर, (स्थानिक गुन्हे शाखा) यांना अहमदनगर जिल्ह्यातल्या अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्याविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात व अंमलदार संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रोहित येमुल, उमाकांत गावडे व मपोकॉ/प्रियंका चेमटे अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

हे पथक शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि हेमंत थोरात यांना दि. 25 मार्च रोजी गुप्तबातमीदारामार्फत इसम नामे सादीक शेख (रा. नवीन बाजारतळ, ता. शेवगांव) हा कब्जात गांजा बाळगून त्याची राहत्या घरी विक्री करतो, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

त्यानंतर या पथकानं तात्काळ शेवगांव पो.स्टे. येथे जाऊन पोनि दिगंबर भदाने व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेऊन छाप्याचे नियोजन केले. या पथकाने लागलीच बातमीतील नमूद ठिकाणी (नवीन बाजारतळ, शेवगांव) येथे जाऊन संशयित नामे सादीक शेख याच्या वास्तव्याबाबत माहिती घेत त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री केली असता सदर घरात एक इसम बसलेला दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सादीक शेख (रा. नवीन बाजारतळ, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.

त्याच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरातल्या कुलरमध्ये पांढ-या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया, बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळून आला.

पोलीस पथकाने पांढ-या रंगाच्या गोणीत मिळून आलेल्या बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला या बाबत विचारणा केली असता त्याने पांढ-या रंगाच्या पिशवीतील बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असून विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने आरोपी नामे 1) सादीक फारुख शेख (वय 28, रा. नवीन बाजारतळ, ता. शेवगांव) याच्या घरातील कुलरमध्ये गोणीत ठेवलेला 38 हजार 550/- रुपये किंमतीचा 3 किलो 980 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला. तो पदार्थ हस्तगत करुन सदर आरोपीविरुध्द पोकॉ शिवाजी अशोक ढाकणे (नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 257/2024 गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदरची कारवाई राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर व प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगरव सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...