ब्रेकिंगगलथान कारभार निवडणूक प्रशासनाचा, नोटीसा माञ मतदारांना; मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर नगर...

गलथान कारभार निवडणूक प्रशासनाचा, नोटीसा माञ मतदारांना; मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर नगर शहर मविआची सडकून टीका

spot_img

गलथान कारभार निवडणूक प्रशासनाचा, नोटीसा माञ मतदारांना..,  मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर नगर शहर मविआची सडकून टीका!

प्रतिनिधी : नगर शहर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे, स्थलांतरित व मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदार यादीवर मविआने हरकत घेतली आहे. याद्वारे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून काही सत्ताधारी राजकीय मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप यापूर्वीच मविआने केला आहे. त्यानंतर निवडणूक प्रशासन जागे झाले असून मतदारांना नोटीसा बजविण्याचे काम सुरू केले आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन मविआने सडकून टीका करत म्हटले आहे की, हा निवडणूक प्रशासनाचा गलथान कारभार आहे. नोटिसा माञ मतदारांना बजावल्या जात आहेत. प्रशासनाने मतदारांना वेठीस धरणे तात्काळ थांबवावे असा इशारा यावेळी दिला आहे.

याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजीराव कदम यांच्यासह विक्रम राठोड, किशोर कोतकर, बाळासाहेब बोराटे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, दत्ता जाधव, विलास उबाळे, पप्पू भाले, उमेश भांबरकर, नलिनी गायकवाड, उषा भगत, सुजित क्षेत्रे, अभिनय गायकवाड, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मविआने पत्रकार परिषद घेत प्रशासनावर शरसंधान साधण्यात आले. यावेळी मविआने म्हटले की, खा.डॉ.निलेश लंके यांच्यासह तिन्ही पक्षांनी निवडणूक प्रशासनाकडे लेखी हरकत घेतल्यानंतर झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील तथाकथित कार्यसम्राट नेत्याशी संगनमत करत केलेल्या बोगस मतदार नोंदणीच्या स्कॅमचा भांडाफोड मविआने केला. आता प्रशासनाच्या मतदारांना नोटीसा म्हणजे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे कुटील षडयंत्र असल्याचा आरोप नगर शहर मविआच्या नेत्यांनी केला आहे.

प्रशासनाने नमुना १४ अंतर्गत नियम १९ (१) (ब) अन्वये मतदारांनाच नोटीसा बजावल्या असून १० सप्टेंबर रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. त्या दिवशी उपस्थित न राहिल्यास मतदारांना आपले काही एक म्हणणे मांडायचे नाही असे समजून मतदार नोंदणी नियम १९६० मधील तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले आहे. नियमाचा बडगा दाखवून पुन्हा एकदा संगनमत करत जी खरी मतदारांची नावे आहेत ती सुद्धा वगळण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मविआने केला आहे. कोणत्याही खऱ्या मतदाराचे नाव प्रशासनाने वगळल्यास नगर शहरामध्ये मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मविआने दिला.

नोटीसा पाहिल्यानंतर मतदारांना धक्का:
यावेळी बोलताना मविआचे नेते म्हणाले की, ज्या वेळी मतदारांच्या हातात नोटीसा पडल्या त्यावेळी त्यांना जबर मानसिक धक्का बसला. मतदाराला माहितीच नव्हते की त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांचे दुबार नाव नोंदवत बनावट निवडणूक ओळखपत्र तयार केली गेली आहेत. आपल्या देशात मतदान ओळखपत्र हे अनेक शासकीय पुरावा म्हणून वापरण्यात येणाऱ्या ओळखपत्रांप्रमाणे विविध कामांसाठी ओळखपत्र म्हणून वापरण्याची मुभा आहे. बोगस मतदार नोंदणी करत मतदारांच्या नावाचा गैरवापर करत उद्या कोणी त्यांच्या नावे खोटे कर्ज प्रकरण, शासकीय योजनांचा खोटा लाभ घेत काही घोटाळे केले तर याला जबाबदार कोण ? त्यामुळे मतदारांनी त्यांच्या दुबार नाव नोंदणीला अत्यंत जागरूकपणे स्वतः विरोध दर्शविला आहे. केवळ राजकीय दहशतीमुळे मतदार समोर येऊन बोलू शकत नाहीत. मतदारांना त्यांच्या नावाचा गैरवापर करत दुबार नोंदविले गेले असल्याचे माहितीच नव्हते. मात्र महाविकास आघाडीने हा प्रकार उजेडात आणल्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीचे आभार मानले असल्याचा दावा यावेळी केला गेला.

खरे तर प्रांताधिकारी, तहसीलदारांना नोटीसा बजवायला हव्या होत्या:
मविआने यावेळी म्हटले की, स्वतः संगनमत करत ज्या प्रशासनातील लोकांनी राजकीय नेत्यांच्या दबावातून मतदारांची फसवणूक करून त्यांच्या नावाचा गैरवापर करत दुबार नोंदणी केली आहे त्यांना नोटीसा बजवायला हव्या होत्या. यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नगर भागाचे प्रांताधिकारी व नगरचे तहसीलदार यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य मतदारांना नोटिसा बजावण्या ऐवजी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या गलथान कारभाराबद्दल नोटिसा बजवायला हव्या होत्या. मतदारांना नोटीसा म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचे यावेळी मविआ नेते म्हणाले.

मविआची हेल्पलाईन:
मविआने नगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी प्रशासनाने बजविलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास, अडचणी येत असल्यास मविआच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मविआचे कार्यकर्ते त्यांना सर्वतोपरी सहकार्य करतील असे म्हटले आहे. यासाठी काँग्रेसचे किरण काळे, मो. ९०२८७२५३६८, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर ९१४५६४५६२९, शिवसेनेचे संभाजी कदम, मो. ९४२२२२२००३ यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक मविआचे हेल्पलाईन क्रमांक म्हणून मतदारांसाठी जाहीर करण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...