राजकारणगजा मारणे कोण, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित ; पण खासदार निलेश लंके...

गजा मारणे कोण, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित ; पण खासदार निलेश लंके हेच अनभिज्ञ कसे?

spot_img

‘मला ‘ती’ सन्माननीय व्यक्ती कोण होती, हे माहीत नव्हते. हे जर माहीत असते तर मी त्यांच्या घरी गेलो नसतो. मला कार्यकर्त्यांनी नेलं. त्यांच्या घरासमोरुन जात असताना त्यांनी हात केला आणि चहा प्यायला बोलावलं. त्यांनी माझा सत्कारही केला. तोपर्यंत मला माहित नव्हतं, ती व्यक्ती कोण आहे’, असं स्पष्टीकरण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी दिलं आहे.

खासदार निलेश लंके यांनी दिलेले हे स्पष्टीकरण महाराष्ट्रातल्या जवळपास कोणालाच पटलेलं नाही. कारण गजा मारणे कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

एवढंच कशाला? आज काल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे. त्यामुळे साधं गुगलवर हे नाव जरी ‘सर्च’ केलं तरी गजा मारणेचा संपूर्ण जीवनपट उलगडला जातो. अशा परिस्थितीत खासदार लंके हे गजा मारणेबद्दल इतके अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या विषयावर राजकारण करु नये, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं असलं तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याची शक्यता आहे.

गजा मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात मोठा प्रभाव आहे. निलेश घायवळ टोळीशी संबंधित पप्पू गावडे आणि अमोल बधे या दोघांच्या हत्येसह गंभीर गुन्हेगारी आरोपांचा मारणे आणि मोहोळ टोळीचा इतिहास आहे. गजा मारणे याला याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून पुण्याच्या येरवडा कारागृहात तीन वर्षांची शिक्षासुध्दा झालेली आहे.

विरोधकांना मिळालंय आयतं कोलीत…!

गजा मारणे जरी गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असला तरी सामाजिक कार्यात मारणे आणि त्याचे साथीदार सक्रिय असतात. मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसाला मारणे टोळीतल्या कोणाचा त्रास आहे, अशी तक्रारही नाही. मात्र गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यानं गजा मारणे बदनाम झालेला. अशा कुविख्यात व्यक्तीला भेटणं, खासदार लंके यांच्या म्हणण्यानुसार ही घटना जरी ‘ॲक्सिडेंटली’ झाली असली तरी या घटनेमुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...