गुन्हेगारीखोट्या सह्या करुन कर्ज प्रकरण केलं मंजूर ; डॉ. राकेश गांधी यांच्यासह...

खोट्या सह्या करुन कर्ज प्रकरण केलं मंजूर ; डॉ. राकेश गांधी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल..!

spot_img

एचडीएफसी बँकेत बनावट कागदपत्रं तयार करुन सेवाभावी संस्थांचे विश्वस्त असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करत तब्बल आठ कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्याचा पराक्रम डॉ. राकेश गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय. याप्रकरणी डॉ. गांधी आणि इतरांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी डॉ. राकेश कांतीलाल गांधी (रा. महादेव अपार्टमेंट, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं, की फिर्यादी कोठारी आणि आरोपी डॉ. गांधी तसेच डॉ. भंडारी हे रेंज फाउंडेशन सोसायटीत तथा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेसह बाबाजी हरजी कर्पे पाटील प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचे विश्वस्त आहेत. डॉ. राकेश गांधी यांचे मित्र डॉ . भंडारी यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या तवलेनगर परिसरातल्या साई एंजल्स स्कूल या संस्थेच्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या स्टेशन रोड शाखेत आठ कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज प्रकरण करण्याचं ठरवलं.

या कर्जप्रकरणासाठी रेंज फौंडेशन सोसायटी तसंच कर्पे पाटील ट्रस्ट या संस्थांना जामीनदार करु, असं सांगण्यात आलं. मात्र त्यासाठी फिर्यादी अमित कोठारी, श्वेता अमित कोठारी आणि रसिकलाल चंदूलाल कोठारी (मयत) यांनी विरोध दर्शविला होता. मात्र हा विरोध डावलून बनावट कागदपत्रं सादर करत डॉ. भंडारी आणि डॉ. गांधी यांनी सदरचं खर्च प्रकरण मंजूर केलं.

या कर्ज प्रकरणात डॉ. राकेश गांधी आणि डॉ. आशिष भंडारी यांनी विश्वासघात करून आमची फसवणूक केल्याचं अमित कोठारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...