गुन्हेगारीखून प्रकरणातला फरार आरोपी जेरबंद ; नगर एलसीबीची कारवाई ...!

खून प्रकरणातला फरार आरोपी जेरबंद ; नगर एलसीबीची कारवाई …!

spot_img

नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण मोबाईलवर बोलत होता. मात्र तो आपला व्हिडिओ तयार करत असल्याचा काहींना संशय आला आणि त्या संशयातून त्या तरुणाला मारहाण झाली. त्या मारहाणीत सदर तरुणाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या त्या आरोपींना नगर एलसीबीच्या पथकानं नुकतीच अटक केली आहे.

काजल स्टीफन मिरपगार (वय 28, रा. नवनागापूर, ता. नगर) यांचे पती अविनाश मिरपगार हे आंधळे चौक, नवनागापूर इथं उभे राहुन फोनवर व्हिडीओ कॉल करुन बोलत होते. तेवढ्यात संग्राम कदम व त्याचे इतर 4 साथीदार तिथं गेले आणि अविनाश मिरपगार हा व्हिडीओ काढत असल्याने त्यास शिवीगाळ व मारहाण करुन त्यास सिमेंट ब्लॉकने डोक्यात मारुन जीवे ठार मारलं.

याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 502/2024 भादविक 302, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी नामे किरण गव्हाणे (रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) हा फरार होता. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना या खुनाच्या गुन्ह्यातल्या फरार आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, देवेंद्र शेलार, फुरकान शेख व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केलं.

स्थानिक गुन्हे शाखेचं हे पथक फरार आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारामार्फत आरोपी नामे किरण गव्हाणे (रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यामुळे पोलीस पथकाने आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

त्याला पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण बाळासाहेग गव्हाणे (वय 26, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितलं.

त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, संपत भोसले, उविपोअ, नगर ग्रामीण विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...