मनोलिला नगरच्या मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जे काम आंम्ही केले, तेच केल्याचे सांगतो. इतर कामाचे श्रेय घेण्याचे काम कधीही केले नाही. दूरदृष्टी ठेवून प्रभागातील विकास कामे मार्गे लावली. आमदार व खासदार यांच्या विकास निधीतून अनेक विकास कामे बोल्हेगावात मार्गी लावण्यात आली. जिथे अडचण असेल तेथे नागरिकांसाठी धावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून अमोल लगड यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या बोल्हेगाव प्रभाग क्रमांक 7 मधील मनोलिला नगर येथील मारुती मंदिराच्या सभामंडप व विविध विकास कामाच्या भूमीपूजनप्रसंगी वाकळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अमोल लगड, लोभाशेठ कातोरे, रणजित परदेशी, राहुल कातोरे, ज्ञानदेव कापडे, अशोक वीर, गिते मामा, अवि व्यवहारे, सुमित शिंदे, महादेव पवार, शशिकांत लोटके, अरुण शिंदे, डॉ. कोंडा, इमामभाई शेख, साधनाताई बोरुडे, सौ.वैशाली राजहंस, सौ. गिरी, सौ. छापेकर, रामदास गीते, अरुण शिंदे, रमेश मुके, संजय शिंदे, सदाशिव कुटे, सागर शिंदे, महादेव पवार, अविनाश व्यवहारे, अतुल लोटके आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, सर्वसामान्यांना विकास कामे हवी आहेत. विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमोल लगड यांनी बोल्हेगावात विविध विकास कामे पाठपुराव्याने सोडविण्यात आली. नागरिकांनी देखील काम करणाऱ्याच्या मागे उभे रहावे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून आनखी विकास कामे मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंभुराजे मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.