राजकारणखासदार डॉ. सुजय विखे आणि निलेश लंकेंच्या विजयावर लावला जातोय सट्टा ?

खासदार डॉ. सुजय विखे आणि निलेश लंकेंच्या विजयावर लावला जातोय सट्टा ?

spot_img

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रचंड गाजते आहे. या निवडणुकीची रंगत आणि निकालाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चहाच्या टपरीवर, पानाच्या ठेल्यावर, किराणा दुकानांत आणि बाजारपेठेत सर्वत्र हीच चर्चा आहे, की विखे निवडून येणार? की लंके निवडून येणार?

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गुप्तपणे पैजादेखील लावण्यात आल्या आहेत. डॉ. विखे जिंकल्यास एक लाख आणि लंके जिंकल्यावर दोन लाख अशा प्रकारच्या पैजा गुप्त पद्धतीने लावल्या जात आहेत.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रसिद्ध असलेल्या फालोडी सट्टा मार्केटमध्ये खासदार डॉ. सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या विजयावर चक्क सट्टा लावण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

राजस्थानचं हे सट्टा मार्केट आंतरराष्ट्रीय किर्तीचं सट्टा मार्केट आहे. उत्तर नगर लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण लोकसभा मतदार संघातली लोकसभेची निवडणूक जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघात कोण खासदार होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.

उत्तर नगर लोकसभा मतदारसंघात अद्यापही सामसूम…!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये आरोपांच्या फैरींवर फैरी झाडल्या जात आहेत. राज्यातल्या प्रमुख वृत्तवाहिन्यांमध्येसुद्धा मुद्द्यावर ‘डिबेट्स’ आयोजित केल्या जात आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत नगर उत्तर किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्षा रुपवते हे तीन प्रमुख उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रचाराच्या दृष्टिकोनातून या लोकसभा मतदारसंघात अद्यापही प्रचाराची धामधूम दिसून न येता केवळ सामसूम दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...