सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसं खासगी फायनान्स कंपन्यांकडून ज्यावेळी होम लोन अर्थात गृह कर्ज घेताहेत, त्या कर्ज प्रकरणांत अनेक खासगी फायनान्स कंपन्या सर्वसामान्यांच्या खिशांवर अक्षरशः दरोडा टाकत आहेत.
अशा अनेक कर्ज प्रकरणात नाशिकचे जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्र निर्भय पार्टीच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल देशभरातल्या जनतेनं घेतली आहे. हजारो नागरिकांचे फोन कॉल्स भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना येत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रश्न असा आहे, की खासगी फायनान्स कंपन्यांकडून सर्वसामान्यांची ही जी आर्थिक लूट होत आहे, तब्बल 40 – 40 वर्षे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी या कंपन्यांकडून मध्यमवर्गीय माणसाला बाध्य केलं जात आहे. हे सारं खूप भयानक आहे. कारण या हफ्त्यांसह फायनान्स कंपन्यांच्या मानसिक छळाला कंटाळून अनेक कर्जदार आत्महत्या करत आहेत.
सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसाला दिलासा देण्याची त्याच्यावर झालेला अन्याय दूर करण्याची जबाबदारी खरं तर केंद्र आणि राज्य सरकारची आहे. यासाठी कडक कायदे करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. भावे यांची महाराष्ट्र निर्भय पार्टी जे कार्य करीत आहे, त्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकार कठोर कायदे करील का, हाच खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र निर्भय पार्टीच्या या पवित्र कार्याचा हा व्हिडिओ आता प्रत्यक्ष तुम्हीच पहा.
https://www.facebook.com/share/v/Bwa2rPpcUN8ohFfb/?mibextid=oFDknk