राजकारणखरंच नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलू शकतो?

खरंच नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलू शकतो?

spot_img

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत प्रचंड चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय झाला, तो म्हणजे या निवडणुकीचा निकाल बदलणार, निवडून आलेल्या खासदार निलेश लंकेची धाकधूक वाढली. उल्लेखनीय म्हणजे अशा प्रकारच्या बातम्या जबाबदार आणि नामांकित वृत्तपत्रानं सोशल मिडियावर दिल्यात. त्यामुळे खरंच नगर दक्षिण लोकसभेचा निकाल बदलू शकतो का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघातून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 5 लाख 55 हजार 868 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मतं मिळाली. या निवडणुकीत लंके यांचा विजय झाला, असा स्पष्ट निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला.

हे सार पार पडल्यानंतर माजी खासदार डॉ. विखे यांना ईव्हीएम मशीनवर संशय आला आणि त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मशीनची तपासणी करण्याचे ठरलं. विशेष म्हणजे त्यासाठी आवश्यक ते शुल्कही विखेंनी भरलं. जनतेच्या भावनेचा आम्ही स्विकार केला असून केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही प्रक्रिया केली जात असल्याचं स्पष्टीकरण डॉ. विखे यांनी दिलंय.

लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर
सर्व ईव्हीएम मशीन्स नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तिहेरी सुरक्षा व्यवस्था होती. ही सुरक्षा व्यवस्था भेदून जाणं कोणालाही शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड ही अशक्यप्राय गोष्ट होती.

कदाचित इव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला असल्यास त्याची तपासणी करण्यात येईल, असा स्पष्ट निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दिला असून खासदार डॉ. विखे यांची तक्रार त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. ईव्हीएम मशीन ज्या कंपनीचे होते, त्या कंपनीचे अधिकारी नगरला येऊन मशीनची पाहणी करणार आहेत.

आता राहिला प्रश्न नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलणार की नाही? नगर जिल्ह्याच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असावी. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर जे काही समोर येईल, त्यावरच या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. मात्र नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल जर बदलला तर नवा इतिहास घडणार आहे. परंतू असं होण्याची शक्यता खूप कमी असल्याचं राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...