नेवासे नगरीत पार पडलेल्या हिंदू आक्रोश सभेत पुण्याचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या दमदार भाषणानं हिंदू धर्मातल्या युवकांमध्ये प्रचंड असं नवचैतन्य पसरलं. या सभेला साध्वी दुर्गासिंह, आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उद्योगपती सचिन देसरडा, ज्ञानेश्वर पेच, युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, प्रकाश गायके आदींसह हिंदूधर्मिय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार लांडगे म्हणाले, ‘ हल्ली काही लोक शंका घेताहेत, की आपलं सरकार आलंय नाही तर आपल्याला त्रास होईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी असा विचार कधीच केला नाही.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात गोव्यातल्या पोर्तुगिजांनी त्यावेळी धर्मांतराचा नुसता सपाटा लावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी संबंधित पाद्री लोकांना बोलवून घेतलं आणि आत्ताच्या आत्ता धर्मांतर करुन हिंदू धर्मात या. त्यावर ते पाद्री उत्तरले, की आमचा धर्म आम्हाला असं करण्याची परवानगी देत नाही. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, तुम्ही अनेक लोकांना तिकडं नेऊन त्यांचं धर्मांतर का करता? त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाद्री लोकांची मुंडकी छाटली. इकडे छत्रपती शिवरायांनी पाद्री लोकांची मुंडकी छाटली आणि तिकडे धर्मांतर बंद झालं.
आजच्या काळात जे काही सुरु आहे, ते थांबलं नाही तर ठीक. अन्यथा आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती करायला भाग पाडू नका’. या सभेची सांगता ज्ञानेश्वरांची जी वैश्विक प्रार्थना आहे, त्या पसायदानानं करण्यात आली.