गुन्हेगारीकोयता आणि चाकूचा धाक दाखवून 'त्या' अनोळखी तिघांनी केली रस्तालूट ; ३...

कोयता आणि चाकूचा धाक दाखवून ‘त्या’ अनोळखी तिघांनी केली रस्तालूट ; ३ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास …!

spot_img

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या नगर तालूका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामरगाव घाटात कोल्हापूरहून शिर्डीकडे जात असलेल्या चौघांना रस्त्यात अडवून अनोळखी तिघा जणांनी कोयता आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळच्या सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम असा ३ लाख 28 हजारांचा ऐवज लंपास करून सुपा परिसराकडे धूम ठोकली.

आज (दि. १) पहाटे साडेतीनच्या दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गणेश मोहन शिंदे (रा. कदमवाडी, ता. करवीर जिल्हा – कोल्हापूर) यांनी फिर्यादी.

या फिर्यादीत म्हटलं आहे, की फिर्यादी शिंदे यांचे मित्र विरेंद्र प्रभाकर सावंत यांचा मुलगा आठ दिवसांपासून हरवला होता. तो शिर्डी येथे सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या माहितीनुसार हरवलेल्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी फिर्यादी शिंदे, त्यांचे मित्र विरेंद्र सावंत, नितीन मनोहर सावंत आणि चालक शिवाजी शंकर राठोड हे सर्वजण काल (दि. ३०) सायंकाळी कोल्हापूरहून शिर्डीकडे इनोव्हा कारमधून (क्र. एम एच. ०९ जी. एफ. ००५०) जायला निघाले. पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी हे सर्वजण सुपा ओलांडून कामरगाव परिसरात आले असता लघवीसाठी थांबले होते.

अचानक त्या ठिकाणी विना नंबरच्या पल्सर या दुचाकीवरुन अनोळखी तिघेजण आले आणि हातातल्या कोयता, चाकूचा हात दाखवत फिर्यादी शिंदे यांच्या हातातल्या बोटांत असलेल्या वेगवेगळ्या राशींचे खडे असलेल्या 15 ग्रॅमच्या अंगठ्या, गळ्यातली तीन तोळ्यांची सोन्याची चैन त्या तिघांनी हिसकावून घेतली. फिर्यादी शिंदे यांचे मित्र नितीन सावंत यांच्या गळ्यातली एक तोळ्याची सोन्याची चैन आणि ८ हजार रुपये रोख रक्कम, दुसरे मित्र विरेंद्र सावंत यांच्या बोटांतल्या प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, सॅमसंग कंपनीचं स्मार्ट वॉच असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते तीन अनोळखी चोरटे विनाक्रमांकाच्या पल्सर या दुचाकीवरुन सुपा गावाकडे निघून गेले.

‘ते’च तिघे आणि ‘तीच’ विना क्रमांकाची पल्सर…!

गेल्या एक वर्षापासून नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चास, कामगार या परिसरात हे तीन अनोळखी इसम विनाक्रमांकाच्या बजाज पल्सर या दुचाकीवरुन रस्तालूट करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. रात्री अपरात्री या परिसरात कोणी लघवीसाठी थांबला की, हे तिघे कोयता आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटतात. या तिघांना पकडण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आलं आहे.

नगर तालूका पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह?

नगर तालुका पोलीस ठाण्याचा परिसर मोठा आहे. या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे असून याकडे पोलिसांची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक होत आहे. चास, कामरगाव या परिसरात नेहमी रस्ता लूट होत आहे. ही रस्ता लूट करणाऱ्या चोरट्यांची एकच ‘मोडस ऑपरेंटी’ आहे आणि ती म्हणजे रस्त्यात लघवीसाठी थांबलेल्या लोकांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडचा किंमती ऐवज आणि रोख रक्कम हिसकावून घेणं. या परिसरात नगर तालुका पोलिसांची नियमितपणे रात्रीची गस्त सुरु आहे की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...