गुन्हेगारी'कोतवाली'च्या 'सिंघम'ने उगारला कारवाईचा बडगा; कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे करणाऱ्या मुला मुलींना...

‘कोतवाली’च्या ‘सिंघम’ने उगारला कारवाईचा बडगा; कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे करणाऱ्या मुला मुलींना पीआय दराडेंनी दिली कडक समज; कॅफे चालक-मालकांविरुध्द केली कारवाई…!

spot_img

महासत्ता भारत

अहिल्यानगर – (दि.०२ डिसेंबर) कोतवाली पोलिस स्टेशन चे पो.नि.’बाजीराव सिंघम’ने उगारला कारवाईचा बडगा; कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे करणाऱ्या मुला मुलींना पीआय दराडेंनी दिली कडक समज; कॅफे चालक-मालकांविरुध्द कारवाई केली.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना आज बातमी मिळाली, की अहिल्यानगर शहरात “द परफेक्ट कॅफे” कोर्ट गल्ली, कर्डिले डायग्नोस्टीकसमोरच्या कॅफेमध्ये काही लोक प्लायवूडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावून अंधारकरुन शाळा आणि महाविद्यालयातल्या मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत आहेत.

पोलीस निरीक्षक दराडे यांनी सहकारी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करणे बाबत कोतवाली गुन्हे शोध पथकास तोंडी आदेश दिले.

सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली हया अश्लील चाळे करताना मिळुन आले काउन्टरवर असलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारणा केली असता त्यांने त्याचे नाव अनुज शिवप्रसाद कुमार वय२० वर्षे रा. प्ररबुजुर्ग फतेहपुर उत्तर प्रदेश हल्ली रा.स्वामी शंकर हॉटेल कल्यान बायपास अहिल्यानगर असे असल्याचे सांगुन मी सदर कॅफेचा मॅनेजर असल्याचे सांगितले.सदर कॅफेचा मालक बाबत विचारना केली असता, महेश पोपट खराडे रा. रभाजी नगर केडगाव अहिल्यानगर सदर कॅफे चे कामकाज हेच पाहत असल्याचे सांगितले.

सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तरी सदर कॅफे शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/सतिष शिंदे यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं। /२०२४ विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९.१३१ (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे मसपोनि/योगीता कोकाटे, सपोनि विकास काळे , पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, पोकों/अभय कदम, अमोल गाढे, रिंकु काजळे, अनुप झाडबुके, सतीष शिंदे, मपोकाँ/पुजा दिख्खत, कोमल जाधव, पल्लवी रोहकले यांचे पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बहुजन समाजाचं प्रामुख्याने मातंग समाजाचं नेतृत्व करणारे आमदार अमित गोरखेसर यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे.- पिंपरी चिंचवड मातंग समाजाची मागणी

बहुजन समाजाचं प्रामुख्याने मातंग समाजाचं नेतृत्व करणारे आमदार अमित गोरखेसर यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात...

विधानसभेतील अपयशानंतर ‘मविआ’ मोठा निर्णय घेणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत; म्हणाले, “विरोधी पक्षांच्या माध्यमातून…”

विधानसभेतील अपयशानंतर ‘मविआ’ मोठा निर्णय घेणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत; म्हणाले, “विरोधी पक्षांच्या माध्यमातून…” Maharashtra...

विधानसभा निवडणुकीत विजयानंतर आमदार शिवाजी कर्डिले यांचा जनता दरबार पुन्हा सुरू..! नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सत्कार केले.

अहिल्यानगर - विधानसभा निवडणुकीत सहाव्या विजयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा...

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...