गुन्हेगारीकोणी कितीही फटाके फोडले तरी डिवायएसपी मिटकेंनी ठोकलेला 'खुट्टा' कोणीच उखडू शकणार...

कोणी कितीही फटाके फोडले तरी डिवायएसपी मिटकेंनी ठोकलेला ‘खुट्टा’ कोणीच उखडू शकणार नाही…!

spot_img

नगरच्या सहकार क्षेत्रातली सर्वात जुनी आणि सहकारातला ‘दीपस्तंभ’ ठरलेल्या नगर अर्बन बँकेत ठेवीदारांच्या तब्बल 13 हजार कोटी रुपयांच्या ठेवींमध्ये घोटाळा घालणारे लुटारु सध्या आनंदात आहेत. खरं तर आर्थिक गुन्हे शाखेत डिवायएसपी संदीप मिटके यांची ‘एन्ट्री’ होताच सर्वच घोटाळेबाजांना दरदरुन घाम फुटला होता. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली झाल्याची बातमी या घोटाळेबाजांना समजली आणि त्यातल्या अनेकांनी फार मोठा प्रताप केल्याच्या थाटात निर्लज्जपणे फटाके फोडले.

फटाके फोडून आसुरी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या या घोटाळेबाजांचा हा आनंद मात्र क्षणिक ठरणार आहे. कारण यामध्ये कायदे प्रचंड कडक असून त्या कायद्याची कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आणि कसल्याच प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे अंमलबजावणी करत संबंधितांच्या मुसक्या आवळण्याचं काम यापुढेही सुरुच ठेवा, असा कानमंत्र डिवायएसपी मिटके यांनी पोलीस निरीक्षक मगर यांना दिला आहे.

पीआय मगर यांच्याकडे पदभार सोपवून डीवायएसपी संदीप मिटके हे नाशिकला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पीआय मगर यांना नगर अर्बन बँकेच्या या घोटाळ्याचा तपास अक्षरशः डोळ्यात तेल घालून करा, अशा सूचना दिल्या आहेत. ठेवीदारांच्या सुदैवानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचं या घोटाळ्याच्या तपासाकडे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे. त्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्या घोटाळेबाजांना आता सुट्टी नाही, असंच वातावरण सध्या पहायला मिळत आहे.

काय सांगतोय कायदा…!

नगर अर्बन बँकेच्या हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात अनेकांच्या स्वप्नांची जळून राख झाली आहे. या बँकेत गुंतवणूक करताना ठेवीदारांनी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं रंगविली होती. मात्र त्यांच्या त्या स्वप्नांचा चुराडा झालाय. परंतु यामध्ये सर्वच ठेवीदारांसाठी एक आशेचा किरण असलेला एक कायदा आहे. हा कायदा म्हणजे घोटाळेबाज सापडत नसेल तर त्याच्या ओळखीच्या व्यक्तीलासुद्धा पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात. आता ओळखीच्या व्यक्ती म्हणजे घोटाळेबाजाचा मित्र, नातेवाईक, त्याचा भाऊ, चुलता, भाचा, मेव्हुणा आदी यापैकी एकाला किंवा गरज भासल्यास अनेकांना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात. आता पीआय मगर या कायद्याची अंमलबजावणी कशा पध्दतीनं करतात, हा फार मोठा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे एकच सांगता येईल, की कोणी कितीही फटाके फोडले तरी डिवायएसपी मिटकेंनी ठोकलेला ‘खुट्टा’ कोणीच उखडू शकणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...