गुन्हेगारीकुत्रा आणि 50 पैशांच्या पोस्ट कार्डमुळे उलगडलं 'त्या' निर्घृण खुनाचं रहस्य...! नेवासा...

कुत्रा आणि 50 पैशांच्या पोस्ट कार्डमुळे उलगडलं ‘त्या’ निर्घृण खुनाचं रहस्य…! नेवासा प्रभारी पी. आय. धनंजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दमदार कामगिरी…!!

spot_img

हल्लीचा जमाना सोशल मिडियामुळे भलेही प्रभावित झाला असेल. पण अशा परिस्थितीत अगदी 50 पैशांच्या पोस्ट कार्डचा वापर करुन निर्घृणपणे खून करणाऱ्या खुनी इसमापर्यंत पोहोचण्याची किमया नेवासा पोलिसांनी यशस्वी करुन दाखवली आहे. एका खुनाचं रहस्य केवळ कुत्रा आणि पोस्टकार्डमुळे उलगडलं आहे. 

त्याचं झालं असं, की बुधवार दिनांक 13/03/2024 रोजी नेवासे तालुक्यातल्या पाचेगाव शिवारात असलेल्या लोखंडी फॉल, कारवाडी इथं खुनाची घटना घडली. 

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील कारवाडी गावच्या हद्दीत ओम साई या हॉटेलचे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६० वर्षे रा. पाचेगाव) यांचा मध्यरात्री अज्ञात इसमानं डोक्यावर टणक वस्तूनं मारुन निर्घृणपणे खून केला.  मागच्या महिन्यात दि. 13 मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. 251/2024 भा.दं.वि. क. 302 अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत होते.

गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी आव्हान स्विकारुन स्थानिक पोलीस स्टेशनकडील पाच पथकं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक अशी एकूण सहा पथकं मागील नऊ दिवस आणि रात्र तपास करीत होती.

तपासा दरम्यान पोलिसांना मिळालेल्या वेगवेगळ्या 34 प्रकारच्या इन्फॉर्मेशनवर मागील नऊ दिवस पोलीस तपास पडताळणी करीत होते. गुन्ह्याच्या संबंधानं जवळपास 120 लोकांकडे तपासणी करण्यात आली होती. घटनास्थळापासून साधारण 300 मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरचं रात्रीच्या वेळच्या अस्पष्ट आणि अंधूक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं तपासणी करताना घटनेच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची आणि श्वानाची म्हणजे कुत्र्याची हालचाल पोलिसांना दिसून आली होती. पोलिसांनी तपासादरम्यान सदर अंदाजे 30 वर्षे वय असलेली व्यक्ती आणि श्वान हाच केंद्रबिंदू निश्चित करुन मागील नऊ दिवस त्यावरच तपास केला.

तपासामध्ये अशी वय वर्षे 30 असलेली कोणती व्यक्ती आहे, की मृतकचा सदर व्यक्तीशी वाद भांडण, वितृष्ट होते आणि त्या व्यक्तीकडे श्वान (कुत्रा) आहे. याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. सदर गुन्ह्यातल्या अज्ञात आरोपी काही व्यक्तींना नक्की माहिती असणार आहे, हे तपास अधिकारी धनंजय जाधव पोलीस निरीक्षक जाणून होते. परंतु सदर व्यक्ती समोर येण्यास घाबरत असल्यानं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोस्टातून 50 पैशांची 100 कार्डं विकत घेऊन त्या कार्डावर स्वतःचं नाव आणि पत्ता स्वतःच लिहून सदरचे कार्ड कारवाडी आणि पाचेगाव शिवारामध्ये वाटप करुन आपल्याला आरोपी माहित असल्यास या कार्डवर फक्त आरोपीचे नाव लिहून सदरचे कार्ड आपण कोणत्याही पोस्ट पेटीत टाकावं, असं आवाहन केलं होतं.

या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कार्डद्वारे सदरचा खून पोपट सुदाम सूर्यवंशी या इसमानं वैयक्तिक भांडणातून केला असल्याबाबतची माहिती दिली होती. पोलिसांनी पोपट सुदाम सूर्यवंशी या इसमाला शिताफीनं ताब्यात घेऊन पोलिसी भाषेत विचारपूस केली. सुरुवातीला त्यानं असं काही केलं असल्याबाबत नकार दिला. परंतू पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीने त्याच्याकडे विचारपूस केली असता पोपट हा ‘पोपटा’सारखा बोलू लागला. आरोपी पोपट सुदाम सूर्यवंशी (रा. कारवाडी) याने सदर खून केल्याबाबतची कबुली दिली आणि ती जागाही दाखवली.

काही दिवसांपूर्वी मयत बाळासाहेब तुवर हे चिकन घेऊन दुसऱ्याच्या घरी बनवण्यास घेऊन जात असताना  त्यांची आणि आरोपी पोपटची भेट झाली होती. त्यादरम्यान त्यावेळी ‘तु दुसऱ्याच्या घरी चिकन बनवायला का घेऊन जातो’, यावरुन आरोपी आणि मृतकचा वादविवाद झाला होता. त्यावेळी मृतकने आरोपी पोपटला मारहाण केली होती. याचा राग मनात धरुन आरोपीने त्याचा काटा काढायचं ठरवलं होतं.

दरम्यान, मंगळवारी 13 मार्च रोजी घटनेच्या दिवशी आरोपी हा मृतक यांच्या हॉटेलवर गेला. तेथे त्याने मृतकच्या डोक्यामध्ये दगडानं घाव घातले आणि तेथून तो पळून गेला, अशी कबुली त्यानं दिली.

सदरचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव, पोलीस हवालदार बबन तमनर, पोलीस हवालदार केदार, पोलीस हवालदार कुसाळकर, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, गणेश फाटक, अंबादास जाधव, आप्पासाहेब तांबे आणि योगेश आव्हाड यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...