कुठल्याच प्रलोभनाला बळी पडू नका: एसपी श्रीकांत धिवरे
भ्रष्टाचार करू नये- जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणत्याही प्रकारचे बेकायदा कृत्ये करून लाच मागू नये, लाच देऊन भ्रष्टाचार करू नये. दैनंदिन कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रकारे गटबाजी, श्रेयवाद व वर्चस्व वादाचे प्रकार करू नयेत. ते खपवून घेतले जाणार नाहीत. तसे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेत कार्यवाही करण्यात येईल.
गंभीर दखल घेणार- गैरप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस ठाणे व अन्य कार्यालयांमध्ये नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांच्या कामकाजावर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यावरील सर्व नियंत्रक तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सर्वांनी आपापली जबाबदारी नेटाने पार पाडावी – गैरप्रकारांसंबंधी वरिष्ठांना माहिती मिळाल्यास तथा तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कुणालाही पाठीशी न घालता संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी समज श्री. धिवरे यांनी उपस्थितांना बैठकीत दिली.
प्रतिमा मलिन होऊ नये- पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे लाच मागून भ्रष्टाचार करू नये, दप्तर दिरंगाईतून कामकाजातील हलगर्जी टाळावी. तसे आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल. समाजात पोलिस दलाची प्रतीमा मलिन होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी, अशी सूचनाही श्री. धिवरे यांनी दिली.