विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे ९, महाविकास आघाडीचे तीन आणि काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. शरद पवार यांच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना २३ पैकी अवघी ९ मतं मिळाली. त्यामुळे त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली.
भारतीय जनता पार्टीचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचा प्रत्येक एक उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला. १४ जागा रिक्त असल्यामुळे २८८ पैकी फक्त २७४ आमदारच या निवडणुकीत मतदान करु शकले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं. भाजपचे गणपत गायकवाड जेलमध्ये असल्यामुळे काँग्रेसने त्यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी त्यांना परवानगी दिली.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले मिलिंद नार्वेकर यांचा अगदी काठावरच विजय झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेसामुळे शरद पवार आणि जयंत पाटील यांची रणनिती या निवडणुकीत पराभूत झाली. मागच्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार ठरवून पाडले होते. मात्र उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच राजकीय पक्षात चांगले संबंध असल्यामुळे त्यांचा या निवडणुकीतला पराभव थोडक्यात टळला.