झारखंड राज्यातल्या मलप्पुरमच्या शिक्षिका रानी सोयामोई महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी एकदा आपुलकीचा संवाद साधत होत्या. हातावर घड्याळाशिवाय कोणतंच आभूषण त्यांनी घातलेलं नव्हतं. त्यांनी तोंडाला पावडरही लावली नसल्याचं उपस्थिती विद्यार्थिनींना मोठं आश्चर्य वाटलं.
शिक्षिका रानी सोयामोई यांचं भाषण इंग्रजीतून होतं. अवघी दोनच मिनिटं त्या बोलल्या. परंतु त्यांच्या प्रत्येक शब्दांत दृढ संकल्प होता.
त्यांच्या त्या भाषणानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांना
प्रश्न विचारले. तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं माझं नाव राणी आहे. सोयामोई माझ्या कुटुंबातलं नाव आहे. मी मूळची झारखंडची आहे. आणखी काही विचारायचंय तुम्हाला? त्या विद्यार्थ्यांमधली एक सडपातळ मुलगी उभी राहिली.
शिक्षिका सोयामोई म्हणाल्या, ‘विचार बेटा’. क्षणाचाही विलंब न करता ती मुलगी म्हणाली, ‘मॅडम, तुम्ही मेकअप का करत नाहीत? मॅडमचा चेहरा अचानक पडला. त्यांच्या माथ्यावर घाम आला. चेहऱ्यावरचं हास्य अचानक फिकं पडलं. उपस्थित सर्वच शांत झाले.
मॅडमनी टेबलावर असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडं पाणी पिलं. प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलीला इशाऱ्यानेच त्यांनी बसायला सांगितलं. त्यानंतर त्या बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, ‘मला सतावणारा प्रश्न तू विचारला आहेस. त्या प्रश्नाचं उत्तर तुला एका शब्दात देता येणार नाही. त्यासाठी तुला माझी संपूर्ण जीवन कहाणी ऐकावी लागेल. त्यासाठी तू दहा मिनिटांचा वेळ देशील का? त्या मुलीसह सर्वांनीच तशी तयारी दाखवली.
मॅडम म्हणाल्या, ‘माझा जन्म झारखंड राज्यातल्या एका आदिवासी परिसरात झाला होता’. थोडसं थांबून उपस्थितांकडे पाहत त्या म्हणाल्या, ‘कोडरमा जिल्ह्यातल्या एका आदिवासी परिसरात असलेल्या छोट्याशा झोपडीत माझ्या जन्म झाला. ती झोपडी पूर्णपणे कोळशांनी भरलेली होती.
माझे आई वडील तिथं खाणकाम करायचे. माझे दोन मोठे भाऊ आणि छोटी बहिण होती. आम्ही त्या झोपडीत राहत होतो. पावसात त्या झोपडीतून पाणी टपकायचं. माझे आई वडील कमी मोबदल्यात त्या खाणीत काम करायचे. कारण त्यांना दुसरं काम मिळालं नव्हतं. ते खूप अवघड काम होतं.
जेव्हा मी चार वर्षांची होते, तेव्हा माझे आई-वडील आणि दोन भाऊ वेगवेगळ्या आजारांनी अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी हे माहीत नव्हतं, की त्या खाणीतली धूळ नाकावाटे शरीरात गेल्यामुळे वेगवेगळे आजार होत होते.
जेव्हा मी पाच वर्षे झाले, तेव्हा माझे दोन भाऊ वेगवेगळ्या आजारांनी मरण पावले. एक हुंदका देऊन मॅडमनी बोलणं बंद केलं आणि हातातल्या रुमालानं डोळे पुसले.
त्यापुढे म्हणाल्या, ‘त्यावेळेस आमचं जेवण साधं पाणी आणि दोन भाकरी असं होतं. माझे दोन भाऊ आजार आणि गरिबीमुळे हे जग सोडून गेले. माझ्या गावात डॉक्टर तर सोडा. साधी शाळा पण नव्हती. ज्या गावात शाळा, हॉस्पिटल, शौचालय आणि वीज नाही, अशा गावाची तुम्ही कल्पना करु शकाल का?
एक दिवस माझे वडील भुकेच्या समस्येमुळे हाडाचा सापळा झालेल्या मला त्या खाणीत घेऊन गेले. ती खाण तशी बदनाम झाली होती. त्या खाणीतल्या खोल खड्ड्यात रांगत रांगत तिथलं प्लास्टिक गोळा करायचं, हे माझं काम होतं. हे काम कमीत कमी दहा वर्षांच्या मुलांनाच शक्य होतं.
आयुष्यात मी प्रथमच पोटभर भाकर खाल्ली. मात्र त्यावेळी मला उलटी झाली. ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होतं, त्यावेळी मी अंधाऱ्या खोलीत प्लास्टिक गोळा करत होते. तिथल्या विषारी धुळीसह मी श्वास घ्यायचे. दिवसातल्या आठ तास काम केल्यानंतर आम्हाला एकवेळचं जेवण मिळायचं. तिथली विषारी धूळ आणि भूक यामुळे मी अत्यंत सडपातळ झाले होते.
एक वर्षानंतर माझी बहीणसुद्धा त्या खाणीत काम करायला लागली होती. एक वेळ अशी आली की माझे आई-वडील, बहीण आणि मी एकमेकांबरोबरच काम करायचो. आई वडील बरे झाल्यानंतर तेदेखील त्या खाणीत काम करायला लागले. भुकेशिवाय आम्ही राहू शकत होतो. मात्र नशिबानं आम्हाला दुसऱ्या प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती.
एक दिवस मला प्रचंड ताप आला त्यामुळे मी खाण्याचे कामावर जाऊ शकले नाही. मात्र अचानक मोठा पाऊस झाला आणि खाण पडल्यामुळे त्यात शेकडो माणसं मरण पावली. त्यामध्ये माझी आई वडील आणि बहीणसुद्धा होती.
शिक्षिका असलेल्या सोयामोई मॅडमच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऐकणाऱ्यांची डोळे डबडबले होते. मॅडम म्हणाल्या, ‘तुम्हाला हे ध्यानात घ्यावं लागेल, की मी त्यावेळी फक्त सहा वर्षांची होते. अखेर मी अगाती मंदिरात पोहोचले. तिथल्या सरकारी शाळेत माझ्या शिक्षण झालं. मी माझ्या गावातच अक्षर पद्धत शिकले होते. आज एक शिक्षिका म्हणून तुमच्यासमोर उभी आहे’.
आपण विचार करत असाल की या गोष्टीचा आणि मी मेकअप का करीत नाही, याचा काय संबंध आहे? त्यावेळी लहानपणी रांगत रांगत मी जे अभ्रक म्हणजे प्लास्टिक गोळा केलं होतं, त्या प्लास्टिकचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं बनवण्यात करण्यात आला होता. या अभ्रकाचा पहिला प्रकार म्हणजे सिलिकेट खनिज आहे.
अनेक मोठमोठ्या कॉस्मेटिक कंपन्या तुमच्या त्वचा उजळून काढण्यासाठी जे सौंदर्य प्रसाधनं तयार करताहेत, वीस हजार लहान मुलं स्वतःचे जीव धोक्यात घालून ते अभ्रक गोळा करताहेत.
लहान मुलांची गुलाबासारखी कोमलता, त्यांची जळलेली स्वप्नं, त्यांचं विखुरलेले जीवन, मोठमोठ्या पर्वतांमध्ये दबलेले मांस आणि रक्त हे सारं मेकअपच्या माध्यमातून तुमच्या गालावर पसरतं.
त्या खाणीतून मुलांच्या हातून गोळा करण्यात आलेलं लाखो डॉलर्सचं ते अभ्रक सौंदर्य प्रसाधनांमध्ये आमची सुंदरता वाढविण्यासाठी आजही वापरलं जातं. आता तुम्हीच सांगा, माझ्या चेहऱ्यावर मी तो मेकअप कसा लावू? मी माझ्या भावाच्या आठवणीत पोटभर कसं जेऊ शकते, जे भुकेच्या समस्येमुळे मरण पावले होते. माझ्या आईच्या आठवणींत मी रेशमी कपडे कसे घालू, जुने फाटलेल्या कपड्या संदर्भात स्वप्नातसुद्धा विचार केला होता’.
भाषण संपून ज्यावेळी राणी सोयामोई गेल्या, तेव्हा उपस्थित प्रेक्षक एका अजाणतेपणातच उभे राहिले. त्यांच्या ओठांवर थोडंसं हसू होतं. डोळ्यात आलेले अश्रू न पुसता त्यांचं मस्तक स्वाभिमानानं उंचावलं होतं.
झारखंड राज्यात आजही उच्च प्रतीचं दर्जेदार अभ्रक त्या खाण्यातून खोदलं जातं आणि 20 हजार मुलं शाळेत न जाताच ते गोळा करण्याचं काम करत आहेत आणि खाणीत पडून तर काही आजाराच्या समस्येमुळे मरत आहेत. मात्र अनेक वर्षानंतर झारखंडची ती शिक्षिका मॅडम आज स्वतंत्र भारताची महामहीम ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू’ झाली. महामहिम राष्ट्रपती मुर्मू यांची ही प्रेरक कहानी तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.