गुन्हेगारीकधी काळी 'तिनं' यमराजाकडून 'त्याचे' प्राण परत आणले ; मात्र 'तोच' आता...

कधी काळी ‘तिनं’ यमराजाकडून ‘त्याचे’ प्राण परत आणले ; मात्र ‘तोच’ आता ‘तिच्या’ जीवावर उठलाय ; वाचा, पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधलं जळजळीत वास्तव…!

spot_img

पतीचं अकाली निधन झाल्यानंतर त्याच्यावर अतोनात प्रेम असलेल्या त्याच्या पत्नीनं त्याचे प्राण परत आणण्यासाठी यमराजाबरोबर संघर्ष केला. नवऱ्याचे प्राण तिनं परत आणल्याची कथा आपल्याकडे सांगितली जाते. मात्र आज त्याच महिलेचीच एक प्रतिनिधी असलेल्या महिलेचे प्राण घेण्यासाठी ‘तिच्या’ नवऱ्यानं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एक प्रकारे नीच कृत्य केलंय.

पुण्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरात घडलेली ही खळबळजनक घटना काहीशी अशी आहे, की पत्नीकडे केलेल्या ‘नको त्या मागण्या’ ती पूर्ण करीत नसल्यामुळे एका नराधम इसमानं स्वतःच्याच पत्नीचं अपहरण केलं. यादरम्यान त्याने त्याच्या पत्नीला अनेक वेळा भूलीचं इंजेक्शनदेखील दिलं.

नवऱ्याच्या ‘नको त्या मागण्यां’ना कंटाळून सदर महिलेनं तिचा पती सुमित याच्यापासून लांब राहणं पसंत केलं. काही महिने मैत्रिणीकडे राहिल्यानंतर ती पिंपरी चिंचवड येथे नोकरीसाठी आली आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात नोकरी करायला लागली.

तिच्या नवऱ्याला ही माहिती कळाली. त्याने तिच्या नोकरीच्या ठिकाणाचा पत्ता शोधत तिला गाठलं आणि बळजबरी कारमध्ये बसवून तिचं अपहरण केलं. सुदैवानं तिच्याबरोबर त्याच्या पत्नीचा मित्रदेखील गाडीत बळजबरी बसला होता. काही अंतर गेल्यानंतर सुमितने त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला गाडीखाली उतरुन दिलं.

यानंतर समितनं त्याच्या पत्नीला अनेक वेळा भुलीचं इंजेक्शन दिलं. पत्नीला स्वतःच्या घरी घेऊन न जाता गाडीतच बसवलं. जेव्हा जेव्हा ती शुद्धीवर यायची, तेव्हा तेव्हा सुमित तिला भुलीच इंजेक्शन द्यायचा.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये एका मंदिरात सुमित आणि त्याची पत्नी थांबले असता भूल उतरली नसल्याचा तिने बहाणा केला. तिथे उभा असलेल्या एका तरुणाला तिने खुनावलं आणि इशाऱ्याद्वारे काही तरी ‘गडबड’ असल्याचं सांगितलं. त्या तरुणानं मंचर पोलिसांना फोन केला आणि सदर मुलीची तिच्या नराधम नवऱ्यापासून सुटका करण्यात आली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सुमित शहाणे या नराधम इसमाविरुद्ध पत्नीचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासादरम्यान पोलीस भुलीच्या दरम्यान सदर महिलेसोबत काय काय घडलं, याविषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...